'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर येथे पुजारी नगर फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष श्रावण मामा पवार यांनी नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालयासमोर नवीन व्यवसायात पदार्पण केले आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या 'दुर्गा बिल्डिंग मटेरियल ॲन्ड ट्रेडर्स' या नवीन दुकानाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
श्रावण मामा पवार यांनी आपल्या सामाजिक कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आता ते बांधकाम व्यवसायाशी संबंधित साहित्य पुरवण्याच्या क्षेत्रातही पाऊल टाकत आहेत. या नवीन उपक्रमामधून ग्राहकांना दर्जेदार साहित्य आणि उत्कृष्ट सेवा देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
या शुभप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रावण मामा पवार आणि त्यांच्या परिवाराने केले आहे. हा उद्घाटन सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्या गुरुवार दि.19 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
या नवीन व्यवसायामुळे तुळजापूर परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना आणि सामान्य नागरिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. 'Only न्युज धाराशिव'तर्फे श्रावण मामा पवार आणि त्यांच्या या नवीन उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा!
0 Comments