"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे भक्तीचा मोठा जागर सुरू झाला असून, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कळशारोहण व ५२ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ मार्च ते २५ मार्च २०२६ या कालावधीत हा सोहळा संपन्न होत आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज वै. सद्गुरु सोपानकाका महाराज देहूकर व वै. श्रीगुरु ज्ञानेश्वर (माउली) महाराज देहूकर यांच्या कृपाशीर्वादाने आणि श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे. यावेळी श्रीगुरु कान्होबा महाराज देहूकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
दैनंदिन भरगच्च कार्यक्रम
सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, गाथा पारायण, भजन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन व कीर्तनानंतर 'हरिजागर' असे आध्यात्मिक कार्यक्रम होत आहेत. यामध्ये ह.भ.प. विनायक पाटील महाराज, ह.भ.प. अंगद चुंगे महाराज, ह.भ.प. शाम जोशी महाराज, ह.भ.प. सचिन जोशी महाराज, ह.भ.प. दत्तात्रय क्षीरसागर महाराज आणि श्रीगुरु कान्होबा महाराज देहूकर यांची प्रवचने व कीर्तने होत आहेत.
मुख्य आकर्षण: कळशारोहण व महाप्रसाद
बुधवार, दिनांक २५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. समाधान महाराज कदम यांच्या शुभहस्ते कळशारोहण विधी संपन्न होईल. त्यानंतर १० ते १२ या वेळेत श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर व अण्णासाहेब यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होईल. या सोहळ्यासाठी तामलवाडी व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गुरु देहूकर सांप्रदायिक भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ, तामलवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष निमंत्रण
सालाबादा प्रमाणे याही वर्षी, वर्ष 26 वे.
सुयोग हॉस्पिटल, तामलवाडी व धनश्री बँक यांच्या वतीने सर्वांना आग्रहाचे आमंत्रण
जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज वै. सद्गुरु सोपानकाका महाराज देहूकर व वै. श्रीगुरु ज्ञानेश्वर (माऊली) महाराज देहूकर यांच्या कृपाशीर्वादाने आणि श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर व श्रीगुरु कान्होबा महाराज देहूकर यांच्या उपस्थितीत तामलवाडी येथे ५२ वा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व कळशारोहण विधी संपन्न होत आहे.
यासाठी आपण, दिनांक २४ मार्च, मंगळवार रोजी सायं. ०६.०० ते ०९.०० या वेळेत महाप्रसादाचे (पंगत) नियोजन केले आहे.
आपण, कुटुंबीय व सहयोगी परिवारासह आगत्य यावे ही नम्र विनंती.
निमंत्रक:
डॉ. रविराज गायकवाड
डॉ. राजलक्ष्मी गायकवाड
सुयोग गायकवाड व
सुयोग परिवार, धनश्री परिवार
स्थळ: सुयोग हॉस्पिटल, तामलवाडी
फोन: 9028501263
0 Comments