Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरात 'हिंदू शक्ती'चा हुंकार! जातीभेद गाडून राष्ट्रकार्यासाठी संघटित व्हा; विजय पुराणिक यांचे आवाहन

 'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ लॉन्स येथे आयोजित 'इंद्रायणी विराट हिंदू संमेलन' प्रचंड उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित या संमेलनात "हिंदू समाजाने विखुरलेले न राहता, जाती-पातीचे भेद गाडून राष्ट्र सामर्थ्यशाली करण्यासाठी एकत्र यावे," असे प्रखर आवाहन सेवा भारतीचे अखिल भारतीय सहसंघटक मंत्री विजयजी पुराणिक यांनी केले.

भक्ती आणि शक्तीचा अभूतपूर्व संगम
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमांच्या दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजयजी पुराणिक, प्रसिद्ध कीर्तनकार हभप पांडुरंग महाराज रेड्डी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश पुजारी (पुजारी नगर फाऊंडेशन) उपस्थित होते. डॉ. सतिश महामुनी यांनी प्रास्ताविकातून संमेलनामागची भूमिका स्पष्ट केली.

विजय पुराणिक यांनी आपल्या भाषणात मोलाचे मार्गदर्शन व हिंदू संमेलना विषयी बोलताना प्रमुख मुद्यावर भर देताना प्रामुख्याने शताब्दी संकल्प: संघाची १०० वर्षे हा हिंदू पुनरुत्थानाचा काळ असून संघ विचार घराघरात पोहोचवणे हेच आताचे ध्येय आहे.
सेवेचा मंत्र: 'सेवा भारती'च्या माध्यमातून समाजातील वंचित आणि पीडित बांधवांच्या उत्थानासाठी वेळ आणि शक्ती खर्च करा.
 एकता हीच गरज: विखुरलेला हिंदू समाज एकत्र आला, तरच राष्ट्र सामर्थ्यशाली होईल.
 भेदभावाचा त्याग: जाती-पातीचे तट तोडून केवळ 'हिंदू' म्हणून संघटित होणे अनिवार्य आहे.
 सावध राहा: समाजात फूट पाडणाऱ्या शक्ती ओळखा आणि धर्माप्रती निष्ठा जपा.
स्वदेशीचा अंगीकार: आपल्या कुटुंबात स्वदेशी जीवनशैली आणि भारतीय संस्कारांना प्राधान्य द्या.
 वेळेचे दान: प्रत्येक हिंदूने आठवड्यातून किमान काही तास समाजासाठी द्यावेत, जेणेकरून कोणीही उपेक्षित राहणार नाही.
आत्मचिंतन: शताब्दी वर्ष हे केवळ उत्सवासाठी नसून आत्मचिंतन करून समाज सक्षम करण्यासाठी आहे.
 राष्ट्रभक्ती: समाजाची सेवा करणे हेच राष्ट्रभक्तीचे सर्वश्रेष्ठ रूप आहे.
अंतिम ध्येय: भारत मातेला पुन्हा विश्वगुरु पदावर बसवण्यासाठी संघटित हिंदू शक्तीची आवश्यकता आहे. या मुद्यावर भर दिला.

'भक्ती आणि शक्ती एकत्र आल्यास राष्ट्र सुरक्षित' - हभप पांडुरंग महाराज रेड्डी
यावेळी हभप पांडुरंग महाराज रेड्डी म्हणाले की, "हे संमेलन म्हणजे हिंदू शक्तीच्या पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. वारकरी संप्रदायाने नेहमीच समतेची शिकवण दिली आहे. आजच्या काळात धर्माचे रक्षण करणे हीच खरी ईश्वरभक्ती आहे." त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून स्वाभिमानी जीवन जगण्याचे आवाहन केले.

भगव्यामय झाला मंगल कार्यालय परिसर
संपूर्ण श्रीनाथ लॉन्स परिसर भगव्या ध्वजांनी आणि 'जय श्रीराम', 'जय भवानी-जय शिवाजी'च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.  हिंदू बांधव आणि स्वयंसेवकांच्या उपस्थितीमुळे या संमेलनाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले होते.

कार्यक्रमाची सांगता:
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सुलाखे यांनी केले, तर आभार श्रीकांत कावरे यांनी मानले. मान्यवरांच्या हस्ते गो-माता पूजन आणि सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. संमेलनानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी 'भोजन प्रसादाची' उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची  व विश्वासार्ह बातमी!

Post a Comment

0 Comments