Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पुण्यात दिमाखदार सोहळ्यात अमरसिंह देशमुख यांना 'ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार प्रदानदिग्गज मान्यवरांच्या हस्ते गौरव; काटीसह धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; अमरसिंह देशमुख यांच्या उद्योग कर्तृत्वाला 'प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्काराने सलामी!

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र आणि धाराशिव येथील प्रसिद्ध 'सन ग्रुप' उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अमरसिंह बाजीराव देशमुख यांना रविवारी पुण्यात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात 'ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत हा राज्यस्तरीय गौरव करण्यात आला आहे.

मान्यवरांची उपस्थिती
नऱ्हे, पुणे येथील ॲड. शार्दुलराव सुधाकरराव जाधववर शैक्षणिक संकुलात २२ मार्च रोजी हा सोहळा पार पडला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या शुभहस्ते आणि मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे सचिव सुनील चव्हाण (IAS), तसेच पुणे आयकर आयुक्त अजय केसरी (IRS) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार अमरसिंह देशमुख यांना प्रदान करण्यात आला. याप्रवेळी ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उद्योजकतेचा सन्मान
अमरसिंह देशमुख यांनी अत्यंत मेहनतीने आणि कल्पकतेने 'सन ग्रुप'च्या माध्यमातून उद्योजकतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या यशाने केवळ काटी गावाचेच नव्हे, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उंचावले आहे. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान आपल्या कर्मभूमीला आणि मार्गदर्शकांना समर्पित केला.

या कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन वर्ल्ड आणि जाधववर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान १० हजार पुस्तकांच्या मोफत वाटप उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. अमरसिंह देशमुख यांच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून आणि विशेषतः काटी ग्रामस्थांकडून त्यांचे मोठ्या उत्साहात अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments