Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

|अभिनंदन 💐 अभिनंदन 💐|🏆 अमरसिंह देशमुखांना 'ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार प्रदान! 🏆🏆काटीचा सुपुत्र, धाराशिवचा अभिमान: उद्योजक अमरसिंह देशमुख यांना 'प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार.🏆

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी/उमाजी गायकवाड
 धाराशिव येथील धडाडीचे उद्योजक आणि 'सन ग्रुप'चे सर्वेसर्वा अमरसिंह बाजीराव देशमुख यांचा पुण्यात दिमाखदार सोहळ्यात गौरव करण्यात आला. त्यांना यंदाचा प्रतिष्ठित 'ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे सचिव सुनील चव्हाण (IAS) आणि पुणे आयकर आयुक्त अजय केसरी (IRS) यांसारख्या दिग्गज मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.

या यशाबद्दल अमरसिंह देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांनी आपल्या उद्योग कर्तृत्वाने धाराशिव जिल्ह्याचा मान वाढवला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

शुभेच्छुक: "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं. 9923005236

Post a Comment

0 Comments