Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

'टीबी हरेगा, देश जितेगा!' तुळजापुरात जागतिक क्षयरोग दिन उत्साहात; रामवरदायिनी शाळेतून जनजागृती रॅली

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर/उमाजी गायकवाड 
"होय! आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो, भारताच्या नेतृत्वाखाली आणि जनभागीदारीच्या बळावर" या प्रेरणेतून आज तुळजापूर येथे जागतिक क्षयरोग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवरदायिनी शाळेच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमाद्वारे क्षयरोग मुक्तीचा निर्धार करण्यात आला.

अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चोरमले आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अविनाश ढगे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती शिवणे मॅडम आणि श्री. सुधाकर कांबळे उपस्थित होते.

रॅलीने दुमदुमला परिसर
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीला डॉ. अविनाश ढगे, श्रीमती शिवणे मॅडम, श्री. सुधाकर कांबळे आणि डॉ. श्रीनिवास माळी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. "डॉट्सची गोळी, करी क्षयरोगाची होळी", "प्रत्येक श्वास मोलाचा, प्रसार थांबवा क्षयरोगाचा" आणि "टीबी हरेगा, देश जितेगा" अशा घोषणांनी तुळजापूरचा परिसर दुमदुमून गेला होता.

.                              --(प्रतिकात्मक छायाचित्र)
टीबी मुक्त भारत २.० अभियानाचा प्रारंभ
रॅलीच्या समारोपानंतर उपस्थित सर्वांनी क्षयरोग दुरीकरणाची शपथ घेतली. याच प्रसंगी 'टीबी मुक्त भारत २.० - जनसेवेचे कार्य महान, टीबी मुक्त भारत अभियान' आणि आयुष्यमान आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तालुका पर्यवेक्षक श्री. महेश पाठक यांनी या मोहिमेबाबत सविस्तर तांत्रिक माहिती दिली.

'निक्षय मित्र' बनण्याचे आवाहन
क्षय रुग्णांना उपचारासोबतच चांगल्या पोषण आहाराची गरज असते. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी 'निक्षय मित्र' बनून रुग्णांना दत्तक घ्यावे व त्यांना अतिरिक्त आहार पुरवून तालुका क्षयरोगमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. श्रीनिवास माळी, डॉ. प्रतीक जगदाळे, श्री. सुधाकर कांबळे, श्रीमती पोद्दार, श्रीमती काजळे, श्रीमती काशीद, श्री. सिंदफळकर, श्री. दंतकाळे, श्री. थोरात, श्री. हंगरगेकर, श्री. हनुमंते, श्री. शहाजी आवटे, श्री. अक्षर बनसोडे तसेच आरोग्य सेविका अभिलाषा सुरवसे, स्वाती कटारे आणि आरोग्य सेवक रेवणसिद्ध भुसाप्पा, अभिजित घुटुकडे, दत्ता पवार, रामलिंग कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बालाजी मुळे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहत राहा - 'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा 

Post a Comment

0 Comments