Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिक्षण व सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ कै. माधवराव पाटील यांची शताब्दी जयंती मुरुममध्ये उत्साहात साजरी

मुरुम | प्रतिनिधी 
शिक्षण, समाजकारण, राजकारण व सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व कै. माधवराव (काका) पाटील यांची १०० वी जयंती रामनवमीच्या निमित्ताने गुरुवारी (ता. २६) मुरुम शहरासह परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कै. पाटील यांनी केले. शिक्षणासोबतच सहकार चळवळीला बळ देण्यासाठी त्यांनी विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून शेती व उद्योग क्षेत्राला चालना दिली. त्यांच्या पारदर्शक व लोकाभिमुख नेतृत्वामुळे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये त्यांचा आदर होता.

जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी भाजप नेते बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव, बबनराव बनसोडे, रशिद शेख, मदन पाटील आदी उपस्थित होते.

त्यानंतर श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सादिकमिया काझी, व्यंकटराव जाधव, अ‍ॅड. व्ही. एस. आळंगे, दिलीप भालेराव, माणिक राठोड, मल्लीनाथ दंडगे, धनराज मंगरुळे, प्रदीप दिंडेगावे, डॉ. दिलीप गरुड, डॉ. राम सोलंकर, डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. श्रीराम पेठकर, डॉ. सदक वली, उल्हास घुरेघुरे, अनुराधा जोशी, राजशेखर कोरे, व्यंकट घोडके, सैपन शेख, धनराज खोंडे, श्रीपाद कुलकर्णी, कमलाकर मोटे, सच्चिदानंद अंबर आदी मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, इंग्लिश स्कूल, नूतन विद्यालय, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी तसेच विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना आदी विविध ठिकाणी जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

मुरुम (ता. उमरगा) येथील पाटील महाविद्यालयात कै. माधवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना मान्यवर

Post a Comment

0 Comments