Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

Only न्यूज धाराशिव विशेष:सम्राट अशोकांनी जगाला शांततेचा आणि मानवतेचा मार्ग दाखवला; भीमनगर-काटी येथे सम्राट अशोक यांची २३३० वी जयंती उत्साहात संपन्न.

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भीमनगर येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३३० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. २६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात अशोक बनसोडे व सहकाऱ्यांनी त्रिशरण पंचशील आणि धम्मवंदना घेऊन केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

अखंड भारताचे निर्माते सम्राट अशोक: नंदू बनसोडे
यावेळी मार्गदर्शन करताना नंदू बनसोडे यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोक यांचे मनपरिवर्तन झाले आणि त्यांनी भगवान बुद्धांचा शांततेचा मार्ग स्वीकारला. त्यांनी भारताची मान जगभरात उंचावली असून अनेक भवन, मठ, स्तूप आणि विहारांची स्थापना करून मानवतेला सन्मार्ग दाखवला. सम्राट अशोक हे केवळ मौर्य वंशाचे राजे नव्हते, तर ते जनता जनार्दनाचा उद्धार करणारे आणि अखंड भारताचे खऱ्या अर्थाने निर्माते होते."

यांची होती उपस्थिती:
या जयंती महोत्सवा प्रसंगी बाबासाहेब बनसोडे, विलास डोळसे, दादाराव भोसले, अनिल बनसोडे, बाळासाहेब साबळे, शषप्पा बनसोडे, राजाबाई बनसोडे,शोजरबाई बनसोडे, रंजना खोरखाने, राजुभाई, भीमराव बनसोडे, शुभम बनसोडे, गणेश डोळसे आणि अनुसया बनसोडे यांच्यासह भीमनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची  व विश्वासार्ह बातमी!

Post a Comment

0 Comments