Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

नातं निष्ठेचं! आमदार रोहित आबा पाटील यांनी मुंबईत घेतली 'चिनके' कुटुंबियांची भेट; 'सुरज हॉस्पिटल'मधील रुग्णसेवेचे केले कौतुक

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
नवी मुंबई / धाराशिव:
तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित (आर.आर.) पाटील यांनी नुकतीच नवी मुंबईतील प्रसिद्ध 'सुरज हॉस्पिटल' ला सदिच्छा भेट दिली. निमित्त होते, दिवंगत लोकनेते आर.आर. (आबा) पाटील यांचे अत्यंत विश्वासू आणि सावलीसारखे सोबत राहिलेले सहकारी बालाजी सोपानराव चिनके यांच्या वडिलांच्या प्रकृतीची चौकशी करण्याचे. राजकीय व्यस्ततेतून वेळ काढून आपल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबासाठी धावून जाणाऱ्या रोहित पाटील यांच्या या भेटीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

१४ वर्षांची अखंड सेवा आणि निष्ठा
बालाजी सोपानराव चिनके हे नाव आर.आर. आबांच्या जवळच्या वर्तुळातील एक अत्यंत महत्त्वाचे नाव. त्यांनी सलग १४ वर्षे आबासाहेबांचे विश्वासू वाहन चालक म्हणून जबाबदारी सांभाळली. केवळ चालक म्हणूनच नव्हे, तर एक जबाबदार आणि निष्ठावान सहकारी म्हणून त्यांनी आबासाहेबांच्या सुरक्षिततेची आणि सोयी-सुविधांची पूर्ण काळजी घेतली. आबासाहेबांचे शासकीय निवासस्थान 'चित्तकूट' बंगल्याची देखभाल आणि व्यवस्थापन चिनके यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडले होते.

कठीण काळातील 'सारथी'
आबासाहेब जेव्हा गंभीर आजारामुळे मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, त्या तीन महिन्यांच्या अत्यंत कठीण काळात बालाजी चिनके हे दिवस-रात्र आबासाहेबांच्या सोबत होते. पूर्ण समर्पणाने त्यांनी केलेली सेवा आजही पाटील कुटुंबियांच्या स्मरणात आहे. आबासाहेबांच्या निधनानंतरही त्यांनी पाटील कुटुंबाशी असलेली आपली निष्ठा कायम ठेवली. त्यांच्या याच निस्वार्थ सेवेमुळे ते केवळ कर्मचारी न राहता पाटील कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. म्हणूनच, चिनके यांच्या वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रोहित पाटील यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.

'गावकी' आणि 'पाहुणकी'चा संगम
सुरज हॉस्पिटलचे सर्वेसर्वा तथा प्रख्यात न्युरो सर्जन डॉ. आर.एन. पाटील हे आमदार रोहित पाटील यांच्याच गावचे (अंजनी) आहेत. आपल्या गावच्या सुपुत्राने वैद्यकीय क्षेत्रात निर्माण केलेले स्थान पाहून रोहित पाटील यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. विशेष म्हणजे, डॉ. आर.एन. पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील काटी (ता. तुळजापूर) येथील ज्येष्ठ नागरिक ॲड. भैरीनाथ साळुंके यांचे जावई आहेत. या कौटुंबिक आणि गावकीच्या नात्यामुळे या भेटीत कमालीचा जिव्हाळा पाहायला मिळाला.

उपस्थित मान्यवर
यावेळी डॉ. आर.एन. पाटील, डॉ. अंजली आर. पाटील, डॉ. उदय पाटील, डॉ. रमा उदय पाटील, डॉ. मिनल सुरज पाटील, अनिल साळुंके (काटीकर), स्वतः बालाजी चिनके, हॉस्पिटलचे मॅनेजर संतोष देशमुख, बालाजी चवळे (काटीकर) आणि स्टाफ नर्स काजल मुल्ला यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची  व विश्वासार्ह बातमी!

Post a Comment

0 Comments