"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
मुरुम | प्रतिनिधी
महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) परीक्षा २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदर्श विद्यालय, उमरगा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी मंत्री तथा लातूर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला.
या स्पर्धेत आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर आणि तालुका स्तरावर अव्वल कामगिरी दाखवली आहे. यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे:
कु. खुशी राठोड (इयत्ता सातवी) – उमरगा तालुका प्रथम क्रमांक, राज्यात २२ वा क्रमांक!
कु. सायना राठोड (इयत्ता सहावी) – उमरगा तालुक्यात दुसरा, राज्यात ३० वा क्रमांक!
चिरंजीव सुभान पटेल (इयत्ता चौथी) – तालुक्यात सातवा, राज्यात तिसरा क्रमांक!
चिरंजीव वेदांत गायकवाड, आयुष मुळे आणि शुभांगी सूर्यवंशी – या सर्वांनी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी पात्रता मिळवली!
या सर्व विद्यार्थ्यांच्या या उत्तम यशाबद्दल आज विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक झाले. यामध्ये सहशिक्षक प्रशांत सोमवंशी, सहशिक्षिका सौ. सुवर्णा चौधरी, प्राचार्य सैपन शेख, पर्यवेक्षक श्रीपाद कुलकर्णी यांच्यासह श्रमाजीवी शिक्षण संस्थेच्या सर्व संचालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
हे यश केवळ विद्यार्थ्यांचेच नाही, तर शाळेच्या शिक्षकवर्ग आणि संस्थेच्या अथक प्रयत्नांचेही आहे. उमरगातील या लहान मुलांनी राज्यस्तरावर नावलौकिक मिळवून धाराशिव जिल्ह्याला अभिमानास्पद केले आहे!
"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा– तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक यशाची बातमी!
0 Comments