Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तरुण उद्योजक गणेश पुजारींच्या हस्ते यमगरवाडी येथे माजी विद्यार्थींचा धमाल मेळावा! 220 खेळाडूंसह क्रिकेट स्पर्धेला भव्य सुरुवात"

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील एकलव्य विद्या संकुल, मंगरूळ यमगरवाडी (जिल्हा धाराशिव) येथे माजी विद्यार्थी मेळावा आणि क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन आज संपन्न झाले. पुजारी नगर फाउंडेशनचे अध्यक्ष आणि तरुण उद्योजक गणेश पुजारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

ही क्रिकेट स्पर्धा आता चौथ्या वर्षात पदार्पण करत असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतून 220 माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत यमगरवाडीचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

उद्घाटन सोहळ्यात समाजवादी पार्टीचे तालुका अध्यक्ष राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते बापू जगदे, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवराव काळे आणि कार्यवाह विवेक अयाचित यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने गणेश पुजारी, राहुल जाधव आणि बापू जगदे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोल्हटकर, प्रतिष्ठानचे सदस्य राजाभाऊ गिजरे, यमगरवाडी मित्र मंडळ पुणे येथील महेश गायकवाड, माजी विद्यार्थी विभाग प्रमुख अनिल घुगे, अण्णासाहेब मगर, संतोष बनसोडे, यशवंत निंबाळकर, माऊली भुतेकर, अशोक बनकर, परमेश्वर काळे, बालाजी राठोड, मनोज काळे, भाऊराव माने, रवी मुळे, प्रकाश विभुते, राजू विभुते आदींसह सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार अनिल घुगे यांनी मानले.
या भव्य मेळाव्यामुळे एकलव्य विद्या संकुलच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, धाराशिव जिल्ह्यातील खेळाडू आणि युवकांसाठी ही स्पर्धा प्रेरणादायी ठरणार आहे!

Only न्युज धाराशिव– तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक यशाची, हक्काची व विश्वासार्ह बातमी!

Post a Comment

0 Comments