Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

डेटा सायन्सकडे विद्यार्थ्यांची झेप; शिवाजी महाविद्यालयात प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात

मुरुम | प्रतिनिधी 
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे नासकॉम, आयबीएम व एच.एच.एच. बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “डेटा सायन्स अ‍ॅण्ड ॲनालिटिक्स” या कौशल्याधारित कोर्सचा प्रमाणपत्र वितरण समारंभ मंगळवार (ता. २४ मार्च) रोजी उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. यावेळी उपप्राचार्य विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, डॉ. वसंत हिस्सल व डॉ. अशोक पदमपल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोर्सचे समन्वयक व प्रशिक्षक, दिल्ली येथील प्रा. भव्य टंडन यांनी विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील वाढत्या संधी, डेटा सायन्सचे बदलते स्वरूप आणि या कोर्समुळे करिअरला मिळणारी नवी दिशा याबाबत मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील विविध करिअर संधी, आवश्यक कौशल्ये तसेच स्पर्धा परीक्षा व रोजगाराच्या पर्यायांविषयी मार्गदर्शन केले. रोजगाराभिमुख कोर्सेसचा लाभ घेऊन सक्षम करिअर घडविण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत रेवते यांनी केले. विद्यार्थिनी रुची चिंचोले व प्रतीक्षा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत कोर्समधील अनुभव शेअर केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास संगणकशास्त्र विभागातील डॉ. भरत शेळके, प्रा. रेश्मा नितनवरे, डॉ. अजय कांबळे, प्रा. फारुख मुल्ला, प्रा. गजेंद्र बनसोडे, प्रा. अब्रार कादरी, प्रा. श्रद्धा पाटील, प्रा. आरती जाधव, प्रा. सपना राठोड, प्रा. मयुरी माडजे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निळकंठ गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राजक्ता माळी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments