तुळजापूर/काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी काटी गणातील विक्रमसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली. तर उपसभापतीपदी सिंदगाव गणातील रोहिणी मेलगिरी यांची निवड करण्यात आली.पंचायत समिती सदस्यांच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर देशमुख यांची सभापतीपदी निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक राजकीय घडामोडींमध्ये या निवडीकडे विशेष लक्ष लागले होते.
सभापती निवडीनंतर देशमुख यांचे समर्थकांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तुळजापूर तालुक्याच्या विकासासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
0 Comments