Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर ग्रामीण भाजपच्या संघटनात्मक निवडी जाहीर; काटी येथील भोलेनाथ बनसोडे आणि दादा करीम बेग यांची भाजप तालुका उपाध्यक्षपदी वर्णी. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार; पक्ष विस्तारासाठी कंबर कसण्याचे आवाहन

काटी/उमाजी गायकवाड
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेलच्या तालुका निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील काटी  येथील सक्रिय कार्यकर्ते भोलेनाथ बाळासाहेब बनसोडे यांची 'अनुसूचित जाती व जमाती' सेलच्या तालुका उपाध्यक्षपदी फेरनिवड, तर दादा करीम ईस्माईल बेग यांची 'अल्पसंख्याक मोर्चा'च्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य विक्रमसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भाले, भाजप तालुकाध्यक्ष महादेव जाधव, अनिल गुंड, मकरंद देशमुख, बालाजी डोंगरे, उपसरपंच संपत पंखे यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले की, "पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटनात्मक बळकटीकरणासाठी या निवडी करण्यात आल्या आहेत. नूतन पदाधिकाऱ्यांनी आपल्या कौशल्याने भाजपचे संघटन अधिक मजबूत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले."

नूतन पदाधिकारी भोलेनाथ बनसोडे आणि दादा करीम बेग यांनी या निवडीबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले असून, पक्ष वाढीसाठी अथक परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल संपूर्ण तुळजापूर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments