धाराशिव | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
1)आंतरराष्ट्रीय घडामोडी: अमेरिका-इस्रायल यांनी इराणवर हल्ले तीव्र केले; इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकन टॉरपीडो हल्ला, 100 हून अधिक बेपत्ता. मध्य पूर्वात तणाव शिगेला, तेल दरात मोठी झेप आणि जागतिक शेअर बाजारात घसरण.
2)राज्यस्तरीय घडामोडी
इराण-इस्रायल युद्धाचा फटका महाराष्ट्राला; आखाती देशांत अडकलेले महाराष्ट्रातील प्रवासी परतण्यासाठी प्रयत्न, केळी निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी संकटात.
3)राज्यस्तरीय घडामोडी
महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर; भाजपकडून नावे घोषित, महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा खासदार होण्याची शक्यता.
4)धाराशिव जिल्ह्या घडामोड
कळंब तालुक्यात पहाटे सशस्त्र दरोडा; कलाकेंद्र चालकाच्या घरात सहा जणांनी पिस्तूल व सुरा दाखवून 9 लाख 51 हजार रुपये लुटले, पोलिस तपास सुरू.
5)धाराशिव जिल्ह्या घडामोड
सुरत-चेन्नई महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मावेजा अत्यल्प असल्याचा रोष व्यक्त करीत बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटीसीची होळी करुन जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले.
0 Comments