Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरात रंगणार अखंड हरिनाम सप्ताह अन् ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा; हनुमान जन्मोत्सवानिमित्त जय हनुमान नगर परिवाराचे आयोजन

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
आई तुळजाभवानीच्या पावन नगरीत श्री हनुमान जयंती उत्सवाचे औचित्य साधून 'जय हनुमान नगर परिवार, नळदुर्ग रोड' यांच्या वतीने भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ पासून या अध्यात्मिक सोहळ्याला प्रारंभ होत असून, ९ एप्रिलपर्यंत भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

या सप्ताहाचे हे चौथे वर्ष असून, तुळजापूर येथील मास्क प्लॉटिंग, नळदुर्ग रोड या ठिकाणी हा सोहळा पार पडणार आहे.

असा असेल दैनंदिन कार्यक्रम:
सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी १ ते २ भोजन आणि दुपारी २ ते ४ या वेळेत ह.भ.प. लक्ष्मीकांत महाराज भिसे यांच्या सुश्राव्य वाणीतून 'श्री देवी भागवत कथा' संपन्न होईल. सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने रंगणार आहेत.

दिग्गज कीर्तनकारांची उपस्थिती:
सप्ताहामध्ये दररोज रात्री ९ वाजता नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होईल, यात:

दि. २ एप्रिल: ह.भ.प. प्रकाश महाराज गवळी

दि. ३ एप्रिल: ह.भ.प. अशोक महाराज यादव

दि. ४ एप्रिल: ह.भ.प. उद्धवबापू महाराज धुंद्रे

दि. ५ एप्रिल: ह.भ.प. निवृत्ती महाराज पांचाळ

दि. ६ एप्रिल: ह.भ.प. आबा महाराज लिंगफोड

दि. ७ एप्रिल: ह.भ.प. बाबासाहेब महाराज चौरे

दि. ८ एप्रिल: ह.भ.प. गणेश महाराज शिरसागर

काल्याचे कीर्तन: गुरुवार दि. ९ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. गुरुमाऊली नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल.

अन्नदानाची विशेष सोय:
सप्ताह काळात दररोज सकाळी नाष्टा, दुपारचे अन्नदान आणि संध्याकाळच्या महाप्रसादाची सोय स्थानिक दात्यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन श्री विश्वनाथ नवनाथ पुजारी व श्रीनाथ मंगल कार्यालय, तुळजापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या सोहळ्यासाठी व्यासपीठ अधिकारी म्हणून ह.भ.प. अंगद (नाना) टेरे महाराज तर चोपदाराची भूमिका ह.भ.प. मोतीराम हिवराळे निभावणार आहेत.

'समस्त जय हनुमान नगर परिवार' आणि आयोजकांनी तुळजापूर शहर व परिसरातील सर्व भाविक भक्तांना या श्रवणभक्तीचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 

अधिक माहितीसाठी श्री. बाळासाहेब नारायणकर (9881778055) किंवा श्री. वैभव मस्के (8087534326) यांच्याशी संपर्क साधता येईल.
ताज्या बातम्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी पाहत राहा 'Only न्यूज धाराशिव'.

Post a Comment

0 Comments