"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक नुकतीच सातारा येथील श्रीलीला रिसॉर्ट, यवतेश्वर (कास पठार) येथे संपन्न झाली. या दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठकीत धाराशिव जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर चमकले असून, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश दौलतराव माने यांची 'डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लोक विद्यापीठा'च्या राज्य कार्यवाहक पदी सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे.
१४ व १५ मार्च २०२६ रोजी झालेल्या या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांतून ३०० हून अधिक सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यातून चंद्रकांत उळेकर आणि रमेश माने यांनी या बैठकीत सहभाग नोंदवला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा विस्तार आणि भविष्यातील दिशा लक्षात घेऊन नवीन राज्य कार्यकारी मंडळाची घोषणा करण्यात आली. यामध्ये राज्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्त्या प्राचार्या प्रमोदिनी मंडपे यांची, तर मार्गदर्शक म्हणून सरोजमाई पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. रमेश माने गुरुजींचा चळवळीतील प्रदीर्घ अनुभव आणि समर्पण पाहून त्यांच्यावर डॉ. नरेंद्र दाभोळकर लोक विद्यापीठाच्या कार्यवाहक पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव:
रमेश माने यांच्या या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीबद्दल अंनिसचे कार्यकर्ते देविदास वडगावकर, प्रा. किरण सगर, देविदास पावशेरे, रमाकांत पाटील, प्रा. डॉ. महेश मोटे, ॲड. रवींद्र मैंदाड आणि चंद्रकांत उळेकर गुरुजी यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments