"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
१. इराण-इस्त्राइल-यूएस युद्ध तीव्र: हूती बंडखोरांनी इराणच्या समर्थनार्थ इस्त्राइलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. सौदी अरेबियातील यूएस बेसवर इराणी हल्ल्यात अनेक अमेरिकन सैनिक जखमी. युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट गहन होत आहे.
२. महाराष्ट्रात एलपीजी आणि पेट्रोल-डिझेलचा तुटवडा: इराण युद्धामुळे गॅस सिलिंडर आणि इंधनाचे संकट निर्माण झाले. अंबरनाथ, लातूरसह अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला.
३. अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट: भोंदू खरात प्रकरणात उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर. रूपाली चाकणकर यांचा राजीनामा आणि सुषमा अंधारे यांचे आरोप. ED चौकशीची शक्यता.
४. सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल: इराण युद्ध सुरू झाल्यापासून सोने १७% स्वस्त झाले. आजचा भाव जाणून घ्या; गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे का?
५. महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि अवकाळी: ३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता. शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन. यवतमाळसह काही भागांत हलका पाऊस झाला.
६. खेळो इंडिया यश: महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी १ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकावले. राज्याचा जबरदस्त परफॉर्मन्स.
७. विजयपत सिंघानिया यांचे निधन: रेमंडचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण विजयपत सिंघानिया यांचे मुंबईत निधन. अंत्यसंस्कार आज दुपारी.
८. मुंबई गोवा महामार्गावर विचित्र घटना: खड्ड्यात मगरींचा मुक्काम! वाहतुकीला अडथळा.
९. पुणे पोलिस भरती परीक्षेत तरुणाचा मृत्यू: धावताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू. अंगावर खाकी वर्दी मिरवण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
१०. धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक: तुळजाभवानी मंदिरात चैत्र पौर्णिमेसाठी तीन दिवस VIP एंट्री बंद. सामान्य भाविकांसाठी सुलभ दर्शनाची व्यवस्था.
११. भारताने २.३८ लाख कोटींच्या संरक्षण प्रस्तावांना मंजुरी: तीनही सेनांसाठी मोठी खरेदी. संरक्षण क्षेत्रात मोठा विकास.
१२. सोलापूर हादरले: बेपत्ता जिम ट्रेनर सचिन मानेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.
१३. महाराष्ट्रात वीज दर कमी होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; उद्योगांसाठी दिलासा.
१४. आयपीएल २०२६ अपडेट: आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना आज. फिल सॉल्टचा जबरदस्त कॅच; बुमराहबाबत चर्चा.
१५. पिंपरी-चिंचवड खळबळ: कौटुंबिक वादात तरुणाने किटकनाशक पिऊन आत्महत्या केली. २२ वर्षीय तरुणी आणि नवजात बाळाचा मृत्यू प्रकरणही चर्चेत.
0 Comments