Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी नगरीत भक्तिचा महाकुंभ!श्री भैरवनाथ-जोगेश्वरी मंदिराचा कळस चढणार, भक्ती मार्ग उजळणार! काटीच्या ग्रामदैवताचा २० मार्चला महासोहळा. गावच्या लेकींचा सन्मान आणि देवाचा जयघोष! ३०० माहेरवाशिणींच्या कलश यात्रेने दुमदुमणार गाव

Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराचा ऐतिहासिक आणि मंगलमय 'कळसारोहण सोहळा' येत्या १९ आणि २० मार्च २०२६ रोजी अत्यंत शाही थाटात संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण काटी नगरीत आनंदाचे उधाण आले असून, भक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.

१९ मार्चला रंगणार 'भक्तीरंग'
सोहळ्याची सुरुवात गुरुवार, १९ मार्च रोजी रात्री 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाने होईल. यामध्ये चिरंजीव सार्थक बावीकर आणि टीम यांचा 'भक्तीरंग' हा सुरेल गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. सुमधुर भजनांच्या स्वरांनी काटीची संध्याकाळ भक्तिमय होणार आहे.

🔥२० मार्च: मुख्य सोहळा आणि कळसारोहण
शुक्रवारी पहाटे ६ वाजल्यापासूनच धार्मिक विधींना प्रारंभ होईल. यामध्ये देवांना रुद्राभिषेक आणि वेदमंत्रोच्चारात कळस पूजन केले जाईल.

भव्य कलश व दिंडी मिरवणूक: सकाळी ९ ते ११ या वेळेत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे गावच्या ३०० पेक्षा जास्त माहेरवाशिणी डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी होणार आहेत.

⛳प्रबोधन व कीर्तन: सकाळी ११ वाजता ह.भ.प. सुनिल महाराज ढगे यांचे कीर्तन होईल. दुपारी १२ वाजता श्री स्वप्निलजी चामणीकर यांचे विशेष प्रबोधनपर संबोधन होईल.

महासोहळा: दुपारी १२:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते मुख्य महाआरती होऊन कळसारोहण संपन्न होईल. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले आहे.

🛕स्वप्निलजी चामणीकर यांच्या हस्ते होणार कळसारोहण
या ऐतिहासिक सोहळ्याचे मुख्य कळसारोहण श्री स्वप्निल सुधाकरराव चामणीकर (प्रांत प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगिरी प्रांत) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

🪆माहेरवाशिणींचा आगळावेगळा सन्मान
काटी गावच्या लेकी-सुनांसाठी हा सोहळा जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. मंदिर समितीने लग्नानंतर सासरी गेलेल्या सुमारे ३०० माहेरवाशिणींना खास निमंत्रित केले आहे. या सर्व महिलांना श्री भैरवनाथ जोगेश्वरीची प्रतिमा आणि साडी-चोळीचा आहेर देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. गावच्या लेकींचा असा सन्मान होणारा हा जिल्ह्यातील दुर्मिळ सोहळा ठरणार आहे.


आवाहन ➡️ या पवित्र आणि मंगलमय सोहळ्यासाठी समस्त काटी ग्रामस्थ आणि मंदिर समितीच्या वतीने सर्व भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments