Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धगधगत्या उन्हात १० वर्षांच्या चिमुकलीचा संयम! मंगरुळच्या बिस्मिल्लाह शेखने पूर्ण केले महिनाभराचे रोजे

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
मंगरुळ | चॉंदसाहेब शेख 
रमजान हा पवित्र महिना त्याग, संयम आणि भक्तीचा महिना मानला जातो. या पवित्र महिन्यात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण अल्लाहची इबादत करतात. मात्र, तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील अवघ्या १० वर्षांच्या अलमिरा उर्फ बिस्मिल्लाह चांदसाहेब शेख या चिमुकलीने कडक उन्हाळ्यात महिनाभर अखंड रोजा ठेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या जिद्दीचे आणि धार्मिक श्रद्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धार्मिक संस्कारांचे उत्तम उदाहरण
अलमिरा ही युवा पत्रकार चांदसाहेब शेख यांची कन्या, तर डॉ. एपीजे अब्दुल कलाम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शेकुंबर शेख यांची पुतणी आहे. घरात असलेल्या धार्मिक वातावरणामुळे अलमिरामध्ये लहानपणापासूनच संस्कार रुजले आहेत. यावर्षी कडक उन्हाचा तडाखा असतानाही, तिने मोठ्या जिद्दीने महिनाभर रोजे पाळण्याचा संकल्प केला आणि तो यशस्वीरीत्या पूर्णही केला.

गावातून कौतुकाचा वर्षाव
इतक्या लहान वयात कडक उन्हात तहान-भुकेवर नियंत्रण मिळवत अलमिराने दाखवलेल्या संयमामुळे ग्रामस्थ भारावून गेले आहेत. "लहान वयातच मुलांमध्ये असे संस्कार रुजले तर ते भविष्यात आदर्श नागरिक बनतील," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. तिच्या या धाडसाचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातून अभिनंदन होत आहे.

कुटुंबियांच्या भावना 
"बिस्मिल्लाह अत्यंत जिद्दी आणि निरागस आहे. तिने स्वतःहून महिनाभर रोजा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, ती स्वतः पहाटे तीन-चार वाजता उत्साहाने उठायची. दिवसभर कडक उन्हातही तिने जो संयम आणि शिस्त पाळली, ते पाहून आम्हीही भारावून गेलो आहोत. इतकी सहनशक्ती अल्लाहनेच तिला प्रदान केली आहे."
— शेख परिवार, मंगरुळ (ता. तुळजापूर)

बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहत राहा: 'Only न्युज  धाराशिव'

Post a Comment

0 Comments