Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
काटी (प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग शंकर साळुंके (वय ७८) यांचे शनिवार, दि. २१ मार्च रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच काटी परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी दुपारी ४:३० वाजता काटी येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
0 Comments