Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

"अश्रूंच्या सादेला यशाचा हुंकार! पंधरा दिवसांपूर्वी वडील गमावले, "संकटावर मात करत रुद्राक्ष साळुंके ठरला 'नवोदय'चा मानकरी;मान्यवरांच्या हस्ते काटी येथेरुद्राक्षचा विशेष सत्कार

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
संकटाच्या काळातही ध्येय निश्चित असेल तर शिखर गाठता येते, हे तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रुद्राक्ष राहुल साळुंके याने सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालात रुद्राक्षची पुणे येथील नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. त्याने या परीक्षेत ९७.५०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.

रुद्राक्षचे वडील कै. राहुल जगन्नाथ साळुंके आणि आई सुप्रिया साळुंके मुलांच्या भवितव्यासाठी पुण्यात स्थायिक झाले होते. मात्र, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी राहुल साळुंके यांचे आकस्मिक निधन झाले आणि साळुंके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण प्रसंगातही रुद्राक्षने जिद्द हारली नाही. "माझ्या पप्पांचे स्वप्न आज पूर्ण झाले," अशी भावूक प्रतिक्रिया त्याने यावेळी दिली.

मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार
रुद्राक्षच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत शुक्रवार, दि. २० रोजी काटी येथील साळुंके निवासस्थानी त्याचा गौरव करण्यात आला. धाराशिव सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, पत्रकार उमाजी गायकवाड, उद्योजक सचिन इंगळे, सुनिल गायकवाड 
यांच्या हस्ते रुद्राक्षला शाल, पुष्पहार आणि पेढे भरवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना सुजित हंगरगेकर म्हणाले की, "पितृछत्र हरवलेले असताना रुद्राक्षने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून तो संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे."

उपस्थित मान्यवर आणि कुटुंबिय
या सत्कार समारंभाप्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर,पत्रकार उमाजी गायकवाड,उद्योजक सचिन इंगळे,सुनिल गायकवाड तसेच साळुंके कुटुंबातील रुद्राक्षचे चुलते सुहास साळुंके, प्रदीप साळुंके, विकास साळुंके, त्याची आजी आणि इतर नातेवाईक उपस्थित होते.

मुलाच्या यशाने सर्वांचे डोळे पाणावले होते, तर दुसरीकडे राहुल साळुंके यांच्या आठवणीने वातावरण भावूक झाले होते. रुद्राक्षच्या या यशाचे संपूर्ण काटी गावातून कौतुक होत आहे.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची  व विश्वासार्ह बातमी!

Post a Comment

0 Comments