Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिष्यवृत्ती परीक्षेत पांगरदरवाडी शाळेची यशस्वी घोडदौड; NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत 8 विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; गुणवंतांचा ग्रामस्थांकडून सत्कार

काटी/उमाजी गायकवाड 
सुरतगाव केंद्रांतर्गत असलेल्या जि. प. प्राथमिक शाळा, पांगरदरवाडी येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील तब्बल आठ विद्यार्थ्यांची निवड झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.

सन 2025-26 मधील एन.एम.एम.एस. परीक्षा दि. 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल मागील आठवड्यात परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आला. त्यामध्ये पांगरदरवाडी शाळेतील वैधवी गायकवाड, प्रणिती मते, सरस्वती साळुंखे, संचिता मते, वैभवी कदम, राजनंदिनी मोरे, कल्याणी क्षीरसागर व सोहम कदम या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सिंधू पोफळे, उपसरपंच सोमनाथ शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम शेळके, शिक्षणप्रेमी नागरिक प्रताप निंबाळकर, श्रीराम कदम व कृष्णाथ पोफळे उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक व्यंकट कोळी, वर्गशिक्षक विशाल जाधव, मार्गदर्शक शिक्षक सहदेव माळी, भावना चौधरी, सहशिक्षक लक्ष्मण मुळे, अनिता माने, शहनाज कोरबू व अंजली घुले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments