Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिवमध्ये गॅस दरवाढ व गॅस तुटवड्या विरोधात काँग्रेस आक्रमक; केंद्र सरकारचा तीव्र निषेध!

धाराशिव |, Only  न्युज धाराशिव' वृत्तसेवा
देशात सातत्याने वाढत असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीने व गॅस तुटवड्यामुळे सर्वसामान्य ग्राहक , व्यवसायिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले असून, या महागाई व गॅस तुटवडा, रेल्वे व सुरत चेन्नई महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प मावेजा विरोधात आज गुरुवार दि‌. 12 रोजी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत गॅस दरवाढ, गॅस सिलिंडर तुटवडा समस्या तात्काळ सोडवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा व रेल्वे व सुरत चेन्नई  महामार्गात गेलेल्या बाधित शेतकऱ्यांना योग्य मावेजा मिळावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

महागाई व गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले
आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी रिकामे सिलिंडर डोक्यावर घेऊन आणि रस्त्यावर चुली पेटवून सरकारचा निषेध केला. "निवडणुका संपताच सरकारने जनतेला महागाईची भेट दिली आहे," असा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. गॅसचे दर गगनाला भिडल्याने व गॅस तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा लाकूड-फाट्यावर स्वयंपाक करण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

प्रशासनाला निवेदन सादर
आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले. जर गॅसचे दर, गॅस सिलिंडर तुटवडा कमी झाला नाही तसेच रेल्वे व सुरत -चेन्नई रस्त्यामध्ये गेलेल्या जमीनीतील धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना जमीनीचा योग्य मावेजा मिळाला नाही तर येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील यांनी दिला आहे. 

या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

.    कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज भैय्या पाटील व पदाधिकारी 

"सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या या दरवाढीचा व गॅस सिलिंडर तुटवड्याचा आम्ही निषेध करतो. सरकारने त्वरित गॅसदर वाढ, गॅस सिलिंडर तुटवडा ही सर्वसामान्य नागरिकांची निर्माण झालेली समस्या तात्काळ सोडवून  सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. तसेच रेल्वे मध्ये व सुरत चेन्नई या महामार्गात जमीनी गेलेल्या बाधित शेतकऱ्यांना योग्य मावेजा देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा"
— ॲड. धिरज (भैय्या) पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय कमिटी, धाराशिव

सर्वात वेगवान व सर्वात विश्वासार्ह बातम्यांसाठी संपर्क करा...
"Only न्युज धाराशिव"
मुख्य संपादक: उमाजी गायकवाड
 (मो. नं. 9923005236)
Only न्युज धाराशिव — बातमी आपल्या हक्काची!

Post a Comment

0 Comments