धाराशिव| Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
1) धाराशिव जिल्ह्यात सर्व पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडी पूर्ण
धाराशिव जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये काल सभापती व उपसभापती पदांच्या निवडी शांततेत पार पडल्या. विविध तालुक्यांत महायुती व इतर पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली असून काही ठिकाणी अनपेक्षित निकालही लागले.
2)धाराशिव पंचायत समितीवर महायुतीचा विजय
धाराशिव पंचायत समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत महायुती समर्थित उमेदवार विजयी झाले. या निकालामुळे तालुक्यात महायुतीची राजकीय ताकद अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.
3) महाराष्ट्रावर 9.32 लाख कोटींचे कर्ज
अर्थसंकल्पीय आकडेवारीनुसार मार्च 2026 अखेर राज्याच्या तिजोरीवर सुमारे 9.32 लाख कोटी रुपयांचे कर्ज असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
4)राज्याच्या अर्थसंकल्पात 75 हजार सरकारी भरतीची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करत राज्यात सुमारे 75 हजार सरकारी पदांसाठी भरती केली जाणार असल्याचे सांगितले.
5)सोन्या-चांदीच्या दरात घसरण
देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली असून 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹1,62,870 प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साह वाढला आहे.
0 Comments