Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सायंकाळच्या बातमी सत्रातील महत्त्वाच्या घडामोडी धडाका! धाराशिव जिल्ह्यात पंचायत समिती निवडींचा धुरळा; तुळजापुरात विक्रमसिंह देशमुखांकडे सूत्रे, पाहा तुमच्या तालुक्यात कोण झाला 'किंग'?

धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा थरार आज संपन्न झाला. जिल्ह्याभरातील आठही तालुक्यांमध्ये कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडींनंतर अखेर नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून, बहुतांश ठिकाणी महायुतीचा बोलबाला पाहायला मिळाला.

तालुकानिहाय 'नूतन' कारभारी: एका नजरेत
खालीलप्रमाणे जिल्हयातील सर्व आठ तालुक्यांचे नूतन सभापती व उपसभापती कोण पहा👇

तालुका नूतन सभापती नूतन उपसभापती राजकीय वर्चस्व✌️
1)तुळजापूर: श्री. विक्रमसिंह देशमुख सभापती सौ. रोहिणी मेलगिरी उपसभापती (भाजप)

2)धाराशिव: सौ. गोकर्ण कदम सभापती (इर्ला पंचायत समिती गण), श्री.प्रमोद पाटील उपसभापती (सिध्देश्वर वडगाव गण भाजप )

3)उमरगा: कु. आकांक्षा ज्ञानराज चौगुले (सभापती) सौ. रेखा इंगळे उपसभापती (शिवसेना शिंदे गट)

4)लोहारा: सौ.पल्लवी जानकर सभापती,श्री. अमोल पाटील, उपसभापती (शिवसेना शिंदे गट)

5)कळंब: सौ. राजश्री वरपे सभापती सौ. प्रणिता चव्हाण उपसभापती महायुती (शिवसेना + भाजप)

6)भूम: पूजा विशाल ढगे, सभापती,प्रियंकाताई रणबागुल महायुती (शिंदे गट + वंचित)

7)वाशी: सौ. प्रणिता गायकवाड सभापती श्री. नितीन रणदिवे शिवसेना शिंदे गट (आ. तानाजी सावंत)

8)परंडा: सौ. अर्चना जाधव श्री. परसू गवारे शिवसेना शिंदे गट (आ. तानाजी सावंत)


तुळजापुरात 'काटी'चा डंका; आ. राणाजगजितसिंह पाटलांचा कानमंत्र
तुळजापूर पंचायत समितीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. सभापतीपदी काटी गणाचे विक्रमसिंह देशमुख तर उपसभापतीपदी रोहिणी मेलगिरी यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

यावेळी बोलताना भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले की, "आगामी काळात प्रत्येक गणात पाच जणांची समिती स्थापन करून, निवडणुकीत मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर द्यावा. विकासकामे करताना सदस्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे."

तसेच, अणदूर गणातून निवडून आलेले इच्छुक उमेदवार रणवीर सुनील चव्हाण यांना आगामी काळात सभापतीपदाची संधी दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यात गुलालाची उधळण!
निवडीची अधिकृत घोषणा होताच सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष केला. "ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहू," अशी ग्वाही नवनिर्वाचित सभापतींनी दिली आहे.

ताज्या आणि वेगवान घडामोडींसाठी पाहत राहा - 'Only न्यूज धाराशिव'

Post a Comment

0 Comments