काटी/ उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, काटी गावचे सुपुत्र विक्रमसिंह देशमुख यांची तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. याच निवडीचे औचित्य साधून मंगळवार, दि. २४ रोजी 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा व 'दैनिक पुण्यनगरी' च्या वतीने त्यांचा सभापती कक्षात विशेष सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विक्रमसिंह देशमुख यांची ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ज्येष्ठ पत्रकार उमाजी गायकवाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.
विकासाचा 'काटी' पॅटर्न तालुक्यात राबवणार!
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित सभापती विक्रमसिंह देशमुख यांनी भावना व्यक्त केल्या की, "मिळालेल्या पदाचा उपयोग हा सत्तेसाठी नसून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी केला जाईल. मित्र परिवाराने आणि पत्रकारांनी दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी मोलाचा आहे."
मान्यवरांची उपस्थिती:
या सत्कार सोहळ्याप्रसंगी अनिल गुंड, मकरंद देशमुख, चंद्रकांत काटे, दादा बेग, संजय महापुरे, शंकर मासाळ यांसह परिसरातील अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच देशमुख यांच्या निवडीचे स्वागत करत, त्यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर पंचायत समितीचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकभिमुख होईल, असा विश्वास व्यक्त केला.
0 Comments