Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

“कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा! भाजपच्या जगातील बलाढ्यतेचे सर्व श्रेय तळागाळातील कार्यकर्त्यांच्या निष्ठेला” - माजी मंत्री बसवराज पाटील

"Only न्युज धाराशिव"वृत्तसेवा  
मुरूम |प्रतिनिधी 
कार्यकर्त्यांशिवाय कोणताही राजकीय पक्ष मोठा होऊ शकत नाही. कार्यकर्ता हा पक्षाचा मुख्य कणा असतो आणि याच कार्यकर्त्यांच्या अथक निष्ठा, मेहनत व समर्पणामुळे आज भारतीय जनता पक्ष (भाजप) राज्यात व देशात सत्तेवर आहे. भाजप आज जगातील सर्वात बलाढ्य पक्ष म्हणून ओळखला जातो, याचे संपूर्ण श्रेय तळागाळातील कार्यकर्त्यांना जाते, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.

बुधवारी (ता. २ एप्रिल) रोजी मुरूम येथील विठ्ठल मंदिरात उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील भाजपची संघटनात्मक आढावा बैठक व बूथ कमिटी चर्चासत्र उत्साहात पार पडले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

मार्गदर्शन करताना बसवराज पाटील यांनी सांगितले की, “प्रत्येक गावातील प्रत्येक वॉर्डनिहाय बूथ कमिटी प्रमुखांनी आपली जबाबदारी पूर्ण जाणीवपूर्वक पार पाडावी. बूथ स्तरावर मजबूत संघटना उभी राहिली तरच पक्ष अधिक मजबूत होईल.”

या महत्त्वपूर्ण बैठकीला मंचावर मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते समितीचे सह-अध्यक्ष शरण बसवराज पाटील, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, मदन पाटील, योगेश राठोड, भरत मारेकर, प्रा. शौकत पटेल, उमेश बारकुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच उमरगा पंचायत समिती सदस्य अमर वाले, संजय मुळे, लोहारा पंचायत समिती सदस्य दत्तात्रय वाघमारे, नागनाथ पाटील, स्वप्नील कारभारी, कारखान्याचे संचालक शिवालिंग माळी, भाजप अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष रब्बानी नबेगावे, सतिश पवार, आलूरचे सरपंच राम जेऊरे, राजू मुल्ला यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य उल्हास घुरघुरे यांनी केले तर आभार गटनेते गणेश अंबर यांनी मानले.
ही बैठक भाजपच्या संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. आगामी निवडणुकांसाठी बूथ स्तरावरील कामगिरी अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.

Post a Comment

0 Comments