Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयडियाथॉन २०२६ स्पर्धेत ४८ युवकांनी सादर केल्या नवनवीन आयडिया

मुरुम | प्रतिनिधी
उमरगा, येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात इनक्युबेशन सेंटर फॉर एंटरप्रेन्युअरशिप, करिअर कट्टा आणि ENSIN फोरम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयडियाथॉन २०२६’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील ४८ युवक, विद्यार्थी व संशोधकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत एकूण २८ स्पर्धकांनी आपल्या नाविन्यपूर्ण आयडियांचे सादरीकरण केले.

संशोधनवृत्ती, नवोपक्रमशीलता, सर्जनशील विचारसरणी आणि प्रभावी सादरीकरण कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक आणि संशोधनाधिष्ठित विविध विषयांवर आपल्या कल्पक संकल्पना मांडल्या.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर धाराशिव येथील मॅनेजमेंट सायन्स विभागातील प्रा. डॉ. विक्रम शिंदे, डॉ. प्रा. सचिन बसैया आणि संजय जगताप यांनी केले. नाविन्यता, मांडणी, सामाजिक उपयुक्तता, संशोधनाधिष्ठित दृष्टिकोन आणि सादरीकरण कौशल्य या निकषांवर स्पर्धकांचे मूल्यमापन करण्यात आले.

विजेते :
प्रथम क्रमांक: चव्हाण जगदीश यांनी पटकावला. त्यांना रु. १,१९९ रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.
द्वितीय क्रमांक: (संयुक्त) माने साक्षी, जाधव मनस्वी आणि योगेश मुगळे यांना प्रत्येकी रु. ४९९ रोख पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तृतीय क्रमांक: चव्हाण आर. बी. यांनी मिळविला. त्यांना रु. ७९९ रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.
उत्तेजनार्थ पारितोषिक: मुरुगेंद्र वाली यांना रु. ४९९ रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.
तसेच विशेष पुरस्कार म्हणून
यंग स्टुडंट आयडिया अवॉर्ड: कु. प्रियंका इंगळे यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले.
रिसर्च स्कॉलर इनोव्हेशन आयडिया अवॉर्ड: विजापूर येथील इराण्णा जबा यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास इंगळे होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या संशोधनाधिष्ठित कल्पना आणि नवकल्पना मांडण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. अशा स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संशोधनाभिमुखता आणि उद्योजकतेची प्रेरणा निर्माण करतात.”
विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, प्रा. जी. एस. मोरे आणि संजय जगताप यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा समन्वयक डॉ. एस. पी. पसरकल्ले यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सी. डी. करे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एस. टी. तोडकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments