काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील युवक संतोष भैरीनाथ गुंड वय 44 यांचे सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात मंगळवार दि.१४ रोजी दाखल करण्यात आले होते. परंतु बुधवार दि.१५ रोजी पहाटे पाच वाजता त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते ग्रामपंचायत सदस्य अनिल गुंड यांचे धाकटे बंधू होते.
त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता काटी येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, एक बहिण, भावजया,पुतणे असा परिवार आहे.
0 Comments