Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरात राष्ट्रीय भू-अलंकरण दिनानिमित्त भव्य रांगोळी; डुल्या मारुती मंदिरात रंगोत्सव; राष्ट्रीय भू-अलंकरण दिनी तुळजापुरात आकर्षक रांगोळीचे सादरीकरण

तुळजापूर | "Only  न्युज धाराशिव" वृत्तसेवा. 
राष्ट्रीय भू-अलंकरण दिनाच्या निमित्ताने तुळजापूर येथील डुल्या मारुती मंदिर परिसरात आकर्षक व देखणी रांगोळी साकारत संस्कार भारतीच्या वतीने गुरुवार दि.२३ रोजी उत्साहात कार्यक्रम पार पडला. तुळजापूर संस्कार भारती संयोजन समितीच्या पुढाकारातून विविध रंगांच्या माध्यमातून साकारलेल्या रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या प्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका सौ. प्रगती गोपाळ कदम यांनी शहरवासीयांना शुभेच्छा देत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांच्या हस्ते रांगोळीचा पहिला बिंदू ठेवण्यात आला तसेच पहिली पणती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

देशभरात २२ एप्रिल रोजी संस्कार भारतीच्या वतीने राष्ट्रीय भू-अलंकरण दिन साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने धाराशिव जिल्हा समितीच्या अंतर्गत तुळजापूर येथे हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमादरम्यान गीतगायनाने वातावरण अधिक भारावून गेले.

यावेळी सह महामंत्री डॉ. सतीश महामुनी, दृश्य विधाप्रमुख शेषनाथ वाघ, प्रांत चित्रकला प्रमुख पद्माकर मोकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्लकुमार शेटे, नगरसेविका सौ. प्रगती कदम, माजी उपनगराध्यक्ष विनोद खपले, जय अंबिका मंडळाचे कालिदास कदम, उपाध्ये बंडोपंत पाठक, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराज, काँग्रेसचे हनुमंत साठे, विवेकानंद कनगरकर, कोषाध्यक्ष अविनाश धट यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संगीता रसाळ यांनी केले.
संस्कार भारतीच्या केंद्राने दिलेल्या प्रारूपानुसार ही रांगोळी अध्यक्ष सौ. अपर्णाताई शेटे, जिल्हा भू-अलंकरण प्रमुख लक्ष्मीकांत सुलाखे व प्रांत चित्रकला प्रमुख पद्माकर मोकाशे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली. यात प्रफुल्लकुमार शेटे, माधुरी कनगरकर, गीता व्यास, गीता रसाळ, रतन मस्के, महेश कुलकर्णी, अविनाश घट व डॉ. सतीश महामुनी यांनी सहभाग नोंदवला.

यावेळी डॉ. सतीश महामुनी यांनी राष्ट्रीय रांगोळी दिनाचे महत्त्व व तुळजापूरची पारंपरिक रांगोळी कला याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच तालुक्यातील सर्व कलावंतांनी संस्कार भारतीच्या सभासद नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात अध्यक्ष सौ. अपर्णाताई शेटे यांनी नगरसेविका सौ. प्रगती कदम यांचा सत्कार केला.

Post a Comment

0 Comments