Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिक्षण क्षेत्रातील ऋषीपरायण व्यक्तिमत्व प्रा. राजेंद्रकुमार खेंदाड यांचा गौरवपूर्ण सेवापूर्ती सोहळा!तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत कृतज्ञता सन्मान

तुळजापूर | विशेष प्रतिनिधी
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक राजेंद्रकुमार खेंदाड हे प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या गौरवपूर्ण सेवापूर्ती निमित्त महाविद्यालयाच्या वतीने एका दिमाखदार सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. श्रीरंग लोखंडे यांच्या शुभहस्ते प्रा. खेंदाड यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास (दादा) बोरगावकर यांनी प्रा. खेंदाड यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करत त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला. याप्रसंगी व्यासपीठावर माजी प्राचार्य जी. एस. मोहिते, माजी प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे, जवाहर महाविद्यालय (अंदुर) चे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य रमेश नन्नवरे, श्रीमती प्रभावती खेंदाड, सौ. सुषमा खेंदाड आणि नगरसेवक दिनेश क्षीरसागर यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.

मानपत्र देऊन विशेष सन्मान
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. रमेश नन्नवरे यांनी प्रास्ताविकातून प्रा. खेंदाड यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. डॉ. उमाकांत चनशेट्टी यांच्या हस्ते खेंदाड गुरुजींना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने डॉ. अनिल शित्रे, डॉ. संजय कोरेकर, प्रा. विनय चौधरी, अमर भरगंडे व अन्य सहकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

नळदुर्ग महाविद्यालयाकडूनही कौतुक
केवळ तुळजापूरच नव्हे तर नळदुर्ग महाविद्यालयाच्या वतीनेही अधीक्षक धनंजय पाटील, सोसायटी चेअरमन समीर पाटील आणि सहकाऱ्यांनी प्रा. खेंदाड यांचा स्वतंत्र सत्कार करून मैत्रीचा ऋणानुबंध जपला.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ. सतीश महामुनी, प्रा. अंबादास बिराजदार, प्रा. अमर बोरगावकर, प्रा. विवेकानंद कुंभार आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संतोष पवार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले, तर प्रा. अमोल जोशी यांनी आभार मानले. या हृदयस्पर्शी सोहळ्याला विद्यार्थी, प्राध्यापक आणि खेंदाड परिवारातील स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी: Only न्युज धाराशिव वृत्तसेवा

Post a Comment

0 Comments