Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ऑनलाईन फार्मसीला केमिस्टचा 'रामराम'! तुळजापुरात औषध दुकानांचा १००% बंद यशस्वी*काळ्या फिती बांधून शांततेत निषेध; आपत्कालीन सेवेसाठी दोन मेडिकल सुरू



"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
ऑनलाईन औषध विक्री, अवाजवी सवलतींच्या नावाखाली सुरू असलेली ग्राहकांची फसवणूक आणि बनावट औषधांच्या वाढत्या धोक्याविरोधात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या बंदला तुळजापूर शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शनिवारी शहरातील सर्व औषध दुकाने कडकडीत बंद ठेवून केमिस्ट बांधवांनी शासनाचे लक्ष वेधले.

मुख्य मागण्या काय?
1.  ऑनलाईन औषध विक्रीवर तातडीने बंदी घालावी.  
2.  ऑनलाईन कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी डिस्काउंटला आळा घालावा.  
3.  बनावट आणि निकृष्ट औषधांपासून नागरिकांचे संरक्षण करावे.

या मागण्यांसाठी केमिस्ट बांधवांनी हाताला काळ्या फिती बांधून शांततामय मार्गाने निषेध नोंदवला. विशेष म्हणजे, बंद दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी असोसिएशनने खबरदारी घेतली होती. शहरातील 'आई मेडिकल' आणि 'ओंकार मेडिकल' ही दोन दुकाने आपत्कालीन सेवेसाठी सुरू ठेवण्यात आली होती. याची पूर्वकल्पना प्रशासनाला देण्यात आली होती.

'आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही'
"ऑनलाईन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे दिली जातात. बनावट औषधांचा धोका वाढला आहे. स्थानिक केमिस्ट रुग्णाला तपासून, समजावून औषध देतो. ती जबाबदारी ऑनलाईन कंपन्या घेत नाहीत," अशी भूमिका यावेळी केमिस्ट बांधवांनी मांडली.

या आंदोलनात जिल्हा सचिव किरण हंगरगेकर यांच्यासह संतोष लोखंडे, सचिन कुंभार, बाबासाहेब कदम, प्रशांत संकपाळ, महेश वट्टे, मयूर शेटे, पवन सोनवणे, नाना रोचकरी, निकम, विशाल शेटे, मनोज शिलवंत आदींसह तुळजापूर शहरातील सर्व केमिस्ट दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याने असोसिएशनने सर्व केमिस्ट बांधवांचे आभार मानले.



Post a Comment

0 Comments