धाराशिव : 'आपलं हरित धाराशिव वृक्ष फाऊंडेशन' आणि स्वप्निल फडकूले यांच्या सहकार्याने मा बाळासाहेब ठाकरे नगर (शाहूनगर) येथील फडकुले प्लॉटमध्ये आयोजित पाचव्या टप्प्यातील वृक्षारोपण मोहिमेत उत्साहात देशी वृक्षांची लागवड करताना मान्यवर, ग्रामस्थ आणि चिमुकले पर्यावरणप्रेमी.
'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
धाराशिव | प्रा.अभिमान हंगरगेकर
शहरातील वाढत्या सिमेंटच्या जंगलाला आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाला पायबंद घालण्यासाठी 'आपलं हरित धाराशिव वृक्ष फाऊंडेशन' च्या वतीने हाती घेण्यात आलेल्या पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेने आता वेग घेतला आहे. रविवारी शहरात एकाच दिवशी उत्साहात पार पडलेल्या विशेष मोहिमेत शहरातील मा बाळासाहेब ठाकरे नगर (शाहूनगर) येथील फडकुले प्लॉट परिसरात पाचव्या टप्प्यात तब्बल ४५ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या स्तुत्य उपक्रमामुळे धाराशिव शहरात पुन्हा एकदा 'हिरव्यागार' पर्वाची सुरुवात झाली असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पर्यावरण रक्षणाचा संकल्प! 'आपलं हरित धाराशिव वृक्ष फाऊंडेशन'च्या वतीने पार पडलेल्या वृक्षारोपण मोहिमेप्रसंगी उपस्थित फाऊंडेशनचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि मान्यवर.
'झाडे लावा, झाडे जगवा' चा नारा; चिमुरड्यांचाही सहभाग ठसला लक्षवेधी!
शहरातील मा बाळासाहेब ठाकरे नगर येथील रहिवासी तथा फडकूले प्लॉटचे मालक श्री. स्वप्निल फडकूले यांच्या विशेष सहकार्याने आणि 'आपलं हरित धाराशिव वृक्ष फाऊंडेशन'च्या माध्यमातून हा भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या मोहिमेत केवळ तरुण आणि ज्येष्ठांनीच नव्हे, तर परिसरातील लहान चिमुरड्यांनी सुद्धा मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून मातीशी जुळलेल्या नात्याची आणि पर्यावरणावरील प्रेमाची अनोखी चुणूक दाखवून दिली.
निसर्गाचे बाळकडू! धाराशिवमधील वृक्षारोपण कार्यक्रमात मातीशी नात जोडताना आणि झाडांच्या लागवडीत उत्साहाने सहभाग घेणारे मान्यवर.
विविध जातींच्या देशी वृक्षांची रोपण मोहीम
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणेही गरजेचे आहे, या विचारातून या टप्प्यात अत्यंत निवडक आणि पर्यावरणपूरक अशा ४५ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये पुढील प्रमाणे विविध प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने गुलमोहर १०,चिंच ५,पास्टल पाम ५,चेरी ५,कडुलिंब ३, करंजी ३,बकुळ ३,कदंब ३,वड २,पिंपळ २,मोहगणी २बदाम २ या वृक्षांचा समावेश आहे.
मान्यवरांची आणि नागरिकांची प्रभावी उपस्थिती
हा रविवार पर्यावरणमय करण्यासाठी धाराशिवमधील अनेक नामवंत व्यक्ती, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित बागल, प्रा. अभिमान हंगरगेकर सर, बांधकाम सभापती अभिजीत काकडे,जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे,
राहुल बारखडे सर, प्रमोद हुग्गे सर, महेश देशमुख, स्वप्निल फडकूले, दाजी आप्पा पवार, आनंद जगदाळे, अमरसिंह गोरे सर, पंडित गुंडरे, तानाजी बचाटे, यशपाल लोखंडे, पवन सूर्यवंशी सर, प्रकाश पांचाळ, प्रफुल्ल पांचाळ, प्रदीप बागल, नागेश काकडे, हणमंत राठोड, बालाजी अंकुश, विशाल अंधारे, रोहित माने, मनोज सरडे, महेश उंबरे, विष्णू पांचाळ, रमाकांत इंगळे, शुभम शिरसठ, राजु झेंडे, आदित्य झेंडे, ऋषिकेश चाकरे, नक्ष शिरसठ, हर्ष पांचाळ, आणि बंडप्पा वडगावे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केवळ वृक्षारोपण नाही, तर संगोपनाचाही संकल्प!
आजवर अनेक ठिकाणी केवळ दिखाव्यासाठी झाडे लावली जातात आणि नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष होते; परंतु 'हरित धाराशिव वृक्ष फाऊंडेशन'ने लावलेल्या प्रत्येक रोपाचे स्वतःच्या मुलाप्रमाणे संगोपन करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. परिसराला ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा आणि भावी पिढीला शुद्ध वातावरण लाभावे, यासाठी फाऊंडेशनच्या या जिद्दीचे संपूर्ण धाराशिव शहरातून स्वागत होत असून, हा उपक्रम इतर भागांसाठीही दीपस्तंभ ठरत आहे.
0 Comments