Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

श्री क्षेत्र झरेगाव येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे दिमाखात आयोजन; धार्मिक विधी व महाप्रसादाचे आयोजन

तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
श्री क्षेत्र झरेगाव (ता.बार्शी) येथील 'श्री दत्त मंदिर सद्गुरू मठ' येथे बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह भाविकांसाठी महाप्रसादाची विशेष सोय करण्यात आली आहे, अशी माहिती मठाचे श्री गुरुवर्य काका महाराज झरेगाव यांनी दिली आहे.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मंदिरामध्ये पहाटेपासूनच विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० या वेळेत श्री दत्त गुरूंचे पूजन, अभिषेक, काकड आरती, सद्गुरूंची महापूजा, तसेच गुरुपादुका पूजन असे विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. या कालावधीत नामस्मरण आणि भजनाच्या गजराने संपूर्ण झरेगाव परिसर भक्तिमय होणार आहे.

धार्मिक कार्यक्रमानंतर दुपारी १२.०० वाजल्यापासून मठाच्या प्रांगणात सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

झरेगावसह बार्शी तालुका, धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त दरवर्षी या गुरुपौर्णिमा उत्सवास हजेरी लावतात. यावर्षीही गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त सद्गुरू मठात दर्शनासाठी आणि धार्मिक विधींचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन श्री क्षेत्र झरेगाव येथील श्री दत्त मंदिर सद्गुरू मठाच्या वतीने करण्यात आले आहे.

        ब्युरो रिपोर्ट : Only न्युज धाराशिव वृत्तसेवा

Post a Comment

0 Comments