Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

रोटरी क्लब तुळजापूरच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात; सामाजिक उपक्रम आणि गुणवंतांच्या गौरवाने सोहळा ठरला वैशिष्ट्यपूर्ण; गरजू विद्यार्थ्यांना सायकली व १००० वह्यांचे वाटप; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते देविदास सौदागर यांच्यासह NEET व १० वीच्या गुणवंतांचा विशेष गौरव

तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचे व्रत जपणाऱ्या रोटरी क्लब तुळजापूरच्या सन २०२६-२७ या वर्षाच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात नवनिर्वाचित अध्यक्ष रोट. अमरदाजी हंगरगेकर व सचिव रोट. संजय मैंदर्गी यांनी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारत आगामी काळात तुळजापूर व परिसरात सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रांत अधिक प्रभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

या पदग्रहण सोहळ्यास रोटरीचे विविध उच्चपदस्थ अधिकारी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. यामध्ये रोटरीचे होणारे प्रांतपाल (DGE) रोट. क्षितिज झावरे, माजी प्रांतपाल (PDG) रोट. विष्णू मोंढे, सहाय्यक गव्हर्नर (AG) रोट. अतुल सोनी, रोट. प्रशांत अपराध, मावळते अध्यक्ष (IPP) रोट. संतोष लोखंडे आणि रोट. राहुल तागड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

शैक्षणिक मदतीचा हस्ते परहस्ते हातभार: ५ सायकली व १००० वह्यांचे वाटप
केवळ सोहळा न ठेवता रोटरी क्लबने या प्रसंगी सामाजिक भान जपत विविध उपक्रमांचे आयोजन केले. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नगरपरिषद शाळा क्र. २, नवीन मराठी प्राथमिक विद्यालय, रामवरदायनी शाळा, जिजामाता कन्या प्रशाला आणि तुळजाभवानी आश्रमशाळा या ५ शाळांमधील विद्यार्थ्यांना १,००० वह्यांचे वाटप करण्यात आले.

तसेच, अंतर लांब असल्याने शिक्षणात खंड पडू नये या उदात्त हेतूने अमर (दाजी) हंगरगेकर यांच्यातर्फे ३ आणि प्रशांत अपराध यांच्यातर्फे २ अशा एकूण ५ गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. यामध्ये समर्थ महादेव क्षीरसागर (भातंब्री), ओंकार अभिमान बंडगर (भातंब्री), रागिनी सतीश पवार (तुळजापूर), श्रावणी सतीश पवार (तुळजापूर) आणि अक्षरा लिंबराज जगदाळे (तुळजापूर खुर्द) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

रोटरी क्लब तुळजापूरच्या पदग्रहण सोहळ्यात गुणवंतांचा सत्कार करताना व सायकलींचे वाटप करताना प्रमुख पाहुणे आणि रोटरीचे पदाधिकारी.

साहित्यिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त साहित्यिक देविदास सौदागर यांचा रोटरी क्लबच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

तसेच शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल विविध गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला:

NEET परीक्षा यश: कादंबरी प्रवीण अपराध, प्रज्वल किरण पवार आणि वास्तवसिंह वडणे.

विधि (LLB) पदवी: ॲड. आदित्य बालाजी ढोबळे.

CBSE १०वी बोर्ड यश (रोटरी परिवार): कु. अक्षरा अमर हंगरगेकर, कु. देवयानी रत्नदीप पाटील, कु. भक्ती अरविंद भोसले आणि कुमार चिंतन संजय जाधव.

समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत सेवा पोहोचावी: मान्यवरांचे आवाहन
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी रोटरी क्लब तुळजापूरच्या सेवाभावी वृत्तीचे मनापासून कौतुक केले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामीण भागातील विकास यावर भर देऊन रोटरीने आपले कार्य अधिक व्यापक करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

या सोहळ्यास नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे, महंत मावजिनाथ बाबा, महंत इच्छागिरी महाराज, महंत आरण्यबुवा महाराज, तसेच ज्येष्ठ रोटेरियन डॉ. एन. आर. मलबा, ॲड. तानाजीराव जगताप, राजाभाऊ घोडके, ज्येष्ठ सदस्य रोट. आप्पासाहेब भैय्या पाटील, रोट. कुंदनकाका कोंडो, रोट. विष्णुदास अंबर यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments