Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडी येथील क्रीडा शिक्षक प्रभाकर जाधव यांचा १ ऑगस्ट रोजी सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळा; आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. प्रभाकर प्रल्हादराव जाधव (सर) यांच्या प्रदीर्घ व दैदीप्यमान शैक्षणिक व क्रीडा सेवेचा गौरव करण्यासाठी आगामी शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष ‘सेवापूर्ती गौरव सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा सकाळी १०:०० वाजता सरस्वती विद्यालय, तामलवाडी येथील प्रांगणात संपन्न होणार आहे.

अनेक मान्यवरांची उपस्थिती
या कृतज्ञता सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. विक्रमजी काळे साहेब, धाराशिवचे निवासी उपजिल्हाधिकारी मा. श्री. विद्याचरण कडवकर साहेब तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ (महाराष्ट्र राज्य) चे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रा. बापूसाहेब अडसूळ यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांकडून संयुक्त आयोजन
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा नैपुण्य रुजवून अनेक खेळाडू घडवणाऱ्या प्रभाकर जाधव सरांच्या या निवृत्तीप्रसंगी संपूर्ण गावात व परिसरात आदराचे वातावरण आहे. या कार्यक्रमाचे आयोजन त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, संस्थेचे अध्यक्ष श्री. बसवणप्पा मसुते, उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर पाटील, सचिव श्री. यशवंत (आण्णा) लोंढे, मुख्याध्यापक श्री. सुहास वडणे (सर), सरस्वती विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व तामलवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले आहे.

या सोहळ्यास तामलवाडी व परिसरातील नागरिक, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments