'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि बहुजन समाजाचे दु:ख आपल्या साहित्यातून मांडणारे लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती यांच्या संयुक्त निमित्ताने येथील येडेश्वरी कन्या प्रशालेत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षकांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भावपूर्ण भाषणे केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. किशोर बनसोडे यांनी भूषवले. अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी लोकमान्य टिळकांचे असंतोषाचे पर्व आणि अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यातील व समाजकारणातील अजोड योगदान यावर सविस्तर माहिती देत, या दोन्ही महान विभूतींची थोरवी उपस्थितांसमोर मांडली.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन करण्यासाठी श्री. गुंगे सर, श्री. कदम सर, श्री. घाडगे सर, श्रीमती चंदनशिवे मॅडम आणि श्रीमती सोनाली साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार दहावीची विद्यार्थिनी वैष्णवी जामगावकर हिने मानले. कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments