Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी


"Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भीमनगर परिसरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहिरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन व पूजन करण्यात आले. याप्रसंगी सभापती विक्रमसिंह देशमुख, बाळासाहेब भाले, आदेश कोळी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नंदू बनसोडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. "१ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव येथे जन्मलेल्या अण्णा भाऊंनी अवघी दीड दिवसाची शाळा शिकूनही आपल्या प्रगल्भ साहित्याने इतिहास घडवला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य, कादंबऱ्या आणि देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि धर्मांधतेविरुद्ध मोठे प्रबोधन केले. आपल्या अजरामर साहित्याच्या बळावर देश-विदेशात मराठी मातीचा ठसा उमटवणारे अण्णा भाऊ समाजसेवा आणि देशभक्तीचे खरे प्रतीक होते," असे प्रतिपादन त्यांनी केले.

या सोहळ्यास अनिल गुंड, संजय महापूर, विकास क्षीरसागर, बाळासाहेब क्षीरसागर, भोलानाथ बनसोडे, श्रावण वाघमोरे, किशोर बनसोडे (लातूर), मोहसीन पठाण (लातूर), शेषप्पा बनसोडे, भीमराव बनसोडे, लतिफ शेख, उब्‍बाबाई साबळे, अनुसया बनसोडे, जाई सुरवसे, राजाबाई काशिनाथ बनसोडे, रंजना कोरखाने यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नंदू बनसोडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments