'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
धाराशिव | प्रा.अभिमान हंगरगेकर
वाढदिवसाचा खर्चिक डामडौल टाळून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणाचा समतोल राखण्याचा एक स्तुत्य उपक्रम धाराशिवमध्ये राबवण्यात आला. रुक्मिणी फाऊंडेशनचे सचिव प्रा. अभिमान हंगरगेकर यांच्या पत्नी सौ. सुनंदा अभिमान हंगरगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. ९) शहरात भव्य वृक्षारोपण करण्यात आले. 'आपलं हरित धाराशिव वृक्ष फाऊंडेशन' आणि रुक्मिणी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला.
शहरातील फडकुले प्लाटिंग, मा. बाळासाहेब ठाकरे नगर आणि शाहूनगर परिसरात हा वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. निसर्गाचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने या मोहिमेत तब्बल ३२ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
लागवड करण्यात आलेल्या वृक्षांमध्ये प्रामुख्याने कडुलिंब २१,बकुळ: ०३,वड ०२, करंजी ०२,रेन ट्री: ०२, पिवळा गुलमोहर: ०२ या वृक्षारोपण मोहिमेला परिसरातील नागरिकांनी आणि फाऊंडेशनच्या सदस्यांनी मोठा प्रतिसाद दिला. केवळ झाडे न लावता त्यांचे संवर्धन आणि संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी उपस्थित नागरिकांनी केला.
या वेळी 'आपलं हरित धाराशिव वृक्ष फाऊंडेशन'चे संस्थापक अध्यक्ष सुमित बागल, प्रा. अभिमान हंगरगेकर, बांधकाम सभापती अभिजीत काकडे, प्रा. प्रकाश पारवे आणि प्रमोद हुग्गे प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच महेश देशमुख, सचिन मोरे, स्वप्निल फडकुले, दाजी आप्पा पवार, अमरसिंह गोरे, राहुल बारखडे, पंडित गुंडरे, पवन सूर्यवंशी, प्रकाश पांचाळ, प्रफुल्ल पांचाळ, प्रदीप बागल, रमेश चव्हाण, हणमंत राठोड, वाघमारे सर, शितल कुमार ऐवळे आणि विशाल अंधारे यांच्यासह फाऊंडेशनचे अन्य सदस्य व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाच्या या आगळ्यावेगळ्या पर्यावरणपूरक भेटीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
0 Comments