Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तृणधान्याचा जागर अन् भक्तांची सेवा; तुळजापुरात कृषी विभागाकडून पदयात्रिक भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन

​"भक्तांच्या सेवेसाठी सज्ज: तुळजापूर येथील विश्वनाथ कॉर्नर येथे पदयात्री भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन. माजी नगराध्यक्ष सचिनभैय्या रोचकरी यांच्या हस्ते पूजन करून महाप्रसाद वाटपाला सुरुवात."
​
तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त देशभरातून तुळजापूरच्या दिशेने येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तीरस आणि आदरातिथ्यात न्हाऊन निघाली आहे. याच भक्तीभाव आणि सामाजिक बांधिलकीचे औचित्य साधत, तुळजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने लातूर रोड येथील विश्वनाथ कॉर्नर परिसर येथे पदयात्री भाविकांसाठी 'सन नवरात्रीचा जागर तृणधान्याचा!' या संकल्पने अंतर्गत भव्य महाप्रसाद वाटपाचा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. 
 
​तुळजापूर पायी चालत येणाऱ्या लाखो भाविकांना उर्जा व तृप्ती देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचा शुभारंभ तुळजापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. सचिनभैय्या रोचकरी यांच्या शुभहस्ते रीतसर पूजा-अर्चा करून करण्यात आला.

​तृणधान्य जनजागृती आणि अन्नदानाचा अनोखा मेळ
​कृषी विभागाच्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ अन्नदान न करता आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या तृणधान्यांचे (भरडधान्य) महत्त्व अधोरेखित करत 'तृणधान्याचा जागर' हा संदेश देण्यात आला.
शेकडो किलोमीटरची पायपीट करत आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या महाप्रसादाने मोठा दिलासा मिळाला.  

​याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी खंबाळेश्वर बचुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद वाटपाचे नियोजन केले.

​अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हिरिरीने सहभाग
​या उपक्रमास कृषी विभागातील अधिकारी नवनाथ आलमले, अजित गोरे, रामानंद बरडे, संतोष माने, प्रकाश शिंदे, धन्यकुमार बिराजदार यांच्यासह महिला अधिकारी व कर्मचारी श्वेता मुळे, अर्चना माळी, गीतांजली पाटील, प्रियंका पवार, नूतन गायकवाड, संपदा डोंगरे व इतर सर्व कर्मचारी वृंदाची प्रमुख उपस्थिती व सक्रिय सहभाग लाभला.  

​कृषी विभागाने केवळ प्रशासकीय कामकाजापुरते मर्यादित न राहता नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर दाखवलेल्या या सामाजिक व धार्मिक बांधीलकीचे तसेच उत्तम आयोजनाचे भाविक व स्थानिक नागरिकांमधून विशेष कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments