Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

​तुळजापुरात वैदिक होम-हवनाची पूर्णाहुती; श्री तुळजाभवानी देवीची 'महिषासुरमर्दिनी' रूपात पूजा संपन्न!​दुर्गाष्टमीनिमित्त भक्तिमय वातावरणात धार्मिक विधी संपन्न; भाविकांची मोठी उपस्थिती

तुळजापूर: शारदीय नवरात्र महोत्सवातील दुर्गाष्टमीनिमित्त श्री तुळजाभवानी देवीची मांडण्यात आलेली अलौकिक अशी 'महिषासुरमर्दिनी' अलंकार महापूजा. (सोबत होमकुंडावर पूर्णाहुती अर्पण करताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व इतर मान्यवर.)

​तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज, सोमवारी (१९ ऑक्टोबर) दुर्गाष्टमीनिमित्त अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात वैदिक होम-हवन विधीची पूर्णाहुती संपन्न झाली. यानंतर श्री तुळजाभवानी देवीची अलौकिक अशी 'महिषासुरमर्दिनी' अलंकार महापूजा मांडण्यात आली.
​वैदिक होम-हवनात पूर्णाहुती
मंदिर परिसरातील होमकुंडावर पार पडलेल्या या मुख्य वैदिक होम-हवन विधीत यजमान म्हणून जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार व त्यांच्या पत्नी सौमय्याश्री पुजार यांनी सहभाग घेतला.

धार्मिक परंपरेनुसार यज्ञकुंडात कोहळा व नारळ अर्पण करून होम-हवनाची पूर्णाहुती देण्यात आली.
​याशिवाय गणेश विहार येथे कोल्हापूर संस्थानच्या वतीने आयोजित होम-हवन विधीत प्रतिपचंद्र प्रयाग व मंदा प्रयाग यांनी यजमानपद भूषवले. तर हैदराबादच्या रावबहादूर संस्थानच्या होम-हवनात विनीत कोंडो व स्वप्नाली कोंडो यांनी यजमान म्हणून धार्मिक विधी पूर्ण केले.

​'महिषासुरमर्दिनी' अलंकार महापूजा
दुर्गाष्टमीचे औचित्य साधून जगदंबा मातेची 'महिषासुरमर्दिनी' स्वरूपातील विशेष अलंकार महापूजा बांधण्यात आली. धार्मिक आख्यायिकेनुसार, महिषासुराच्या अत्याचारातून देवांची व सृष्टीची मुक्तता करण्यासाठी आदिशक्ती प्रकट झाली होती. तिने महिषासुराचा वध करून दुष्टांचा संहार केला. देवीच्या या शौर्याचे, पराक्रमाचे आणि विजयाचे स्मरण म्हणून दुर्गाष्टमीला ही पूजा मांडण्याची जुनी धार्मिक परंपरा आहे.

​मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, नागेश शितोळे, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, उपाध्ये बंडू पाठक, अनंत कोंडो, रामचंद्र पाटील, किशोर गंगणे यांच्यासह पुजारी, सेवेकरी, मंदिर संस्थानचे कर्मचारी व भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​दरम्यान, काल रविवारी (१८ ऑक्टोबर) श्री तुळजाभवानी देवीची पारंपरिक पद्धतीने अश्वारूढ छबिना मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.

Post a Comment

0 Comments