Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

​तुळजापूर-नळदुर्ग मार्गावर भक्ती अन् सेवाभाव! देवसिंगा येथे महावीर लोध धर्मशाळेतर्फे भाविकांसाठी अन्नछत्र; ​नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रामदिन परिवाराचा दातृत्वाचा वसा; सलग चार दिवस हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप

देवसिंगा येथे सेवाभाव! तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील देवसिंगा येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित अन्नदान सोहळ्यात महावीर लोध धर्मशाळेचे मालक रामदिन जगदीश सिंग, रामदिन रवी सिंग आणि व्यवस्थापक दत्ता राठोड भाविकांना आदरपूर्वक महाप्रसाद वाढताना.

​तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
आदिशक्ती श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी भक्ती आणि दातृत्वाचा संगम पाहायला मिळत आहे. याच सेवाभावी परंपरेची जपणूक करत तुळजापूर - नळदुर्ग राज्यमार्गावरील देवसिंगा (तुळ) येथे श्री महावीर लोध धर्मशाळा (तुळजापूर) आणि रामदिन परिवाराच्या वतीने भक्तांसाठी सलग चार दिवस भव्य अन्नदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

​देवीच्या दर्शनासाठी पायदळ व विविध वाहनांनी येणाऱ्या भाविकांची महामार्गावर कोणतीही गैरसोय होऊ नये, या उदात्त हेतूने हा अन्नछत्राचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अत्यंत आदराने व आपुलकीने गरमागरम महाप्रसादाचे वाटप केले जात आहे.

​स्वतः अन्न वाढून रामदिन परिवाराकडून भक्तांची सेवा
​केवळ उपक्रम आयोजित करून न थांबता, समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करत रामदिन परिवारातील सदस्यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना महाप्रसाद वाढण्याची सेवा बजावली. या सेवाभावी उपक्रमाच्या वेळी श्री महावीर लोध धर्मशाळेचे मालक रामदिन जगदीश सिंग आणि रामदिन रवी सिंग तसेच व्यवस्थापक श्री दत्ता राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. उपाशीपोटी येणाऱ्या भक्ताला अन्न देऊन त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हीच खरी ईश्वरसेवा, या भावनेतून हा उपक्रम राबवला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.

​पायदळ भाविकांना मोठा दिलासा; सर्वस्तरातून कौतुक
​नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरून चोवीस तास भाविकांची मोठी वर्दळ असते. अशा वेळी देवसिंगा येथील या अन्नदानामुळे दूरवरून येणाऱ्या पायदळ वारकऱ्यांना आणि भक्तांना मोठा मानसिक व शारीरिक दिलासा मिळाला आहे. रामदिन परिवार आणि महावीर लोध धर्मशाळेच्या या सामाजिक व धार्मिक बांधीलकीचे तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून जोरदार कौतुक होत आहे.

​

Post a Comment

0 Comments