Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

​श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा संपन्न; मोर वाहनातून निघाला भव्य छबिना

​'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा
तुळजापूर (दि. १८ ऑक्टोबर)
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सातव्या दिवशी (सप्तमी) कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची अलौकिक आणि मंगलमयी 'भवानी तलवार अलंकार महापूजा' अत्यंत भक्तिभावात मांडण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेला ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा हा अनमोल वारसा अनुभवण्यासाठी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मंदिर परिसरात अलोट गर्दी केली होती.

​छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी आणि रक्षणासाठी श्री तुळजाभवानी देवीने भवानी तलवार प्रदान केली होती, अशी दृढ लोकधारणा आहे. याच दिव्य तलवारीच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना शक्य झाली. या महान ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचे स्मरण म्हणून दरवर्षी नवरात्रोत्सवात सप्तमीच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्याची प्राचीन परंपरा आहे. आजच्या महापुजेच्या रूपाने भक्तांना या ऐतिहासिक वैभवाचे डोळे भरून दर्शन घेता आले.

​मोर वाहनातून तुळजाभवानी देवीचा भव्य छबिना
​दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी) रात्री श्री तुळजाभवानी देवीची पारंपरिक छबिना मिरवणूक अत्यंत उत्साहात काढण्यात आली. यावेळी तुळजाभवानी देवीची मूर्ती 'मोर' वाहनात विराजमान करण्यात आली होती. ढोल-ताशांचा गजर, संबळाचा निनाद आणि 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषाने संपूर्ण तुळजापूर नगरी दुमदुमून गेली होती.

​या धार्मिक सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये सोलापूर मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, तसेच महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी, विविध सेवेकरी आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments