Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कांदा निर्यात बंदीविरोधात तामलवाडी येथील टोलनाक्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी

काटी| उमाजी गायकवाड 
केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यात बंदी जाहीर केल्याने कांद्याचे भाव अचानक कोसळल्यामुळे तामलवाडीसह सावरगाव ,काटी,वडगाव (काटी), केमवाडी,सुरतगाव,पांगरदरवाडी,सांगवी (काटी) आदी गावातील संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सोलापूर -धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी टोलनाक्यावर रविवार  दि. 10 रोजी सकाळी दहा वाजता कांदा रस्त्यावर फेकून केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत जवळपास सव्वा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे सव्वा तास चाललेल्या या आंदोलनामुळे सोलापूर व तुळजापूरकडून येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. सोलापूरहून येणाऱ्या ॲम्ब्युलन्सला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी गर्दीतून वाट मोकळी करून दिली.

नुकत्याच झालेल्या गरपीटीतून शेतकरी सावरत होते. त्यात कांद्याला चांगला दर मिळत होता. पण, अचानक केंद्र सरकारने निर्यात बंदी केली. हा  निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला. अत्यल्प पाऊस, उत्पादन खर्चात झालेली वाढ, अशा एक ना अनेक संकटांवर मात करुन पिकविलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे.कांद्याचे भाव भरमसाठ कोसळले. त्यामुळे केंद्र  सरकार विरोधात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी तामलवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांनी रास्ता  रोको आंदोलन करुन तीव्र निषेध नोंदवला. जर सरकारने निर्यातबंदी मागे घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.


    सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर 
"केंद्र सरकारने कांद्यावर अचानकपणे शुक्रवार दि. 8 डिसेंबर रोजी निर्यात बंदी लादल्याने कांद्याचे भाव पडले. आधीच अवकाळी व गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे, त्यातच शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक राहिल्याने त्या कांद्यास थोडाफार भाव मिळत असल्याने केंद्र सरकारने शहरी लोकांचा विचार करत तातडीने निर्यात बंदी लादली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
       सुजित हंगरगेकर
 जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद धाराशिव

    ॲड. अभिषेक थोरात, कांदा उत्पादक केमवाडी 

भारतीय जनता पक्ष शेतकरीविरोधी असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्थ झाला आहे. शेतकऱ्यांच्या  कुठल्याही मालाला भाव मिळत नाही तसेच कांदा निर्यात  बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भावही घसरले आहे. सध्याचे भाजप  सरकार उद्योग व नोकर धार्जिणे असून  कांदा निर्यात  बंदीमुळे काढणीच्या खर्चाएवढाही भाव बाजारात नसल्याने हजारो शेतकरी कांदा शेतातच कुजवत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्यासाठी केंद्र  सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठवावी
ॲड. अभिषेक थोरात, कांदा उत्पादक केमवाडी

                        जुबेर शेख, उपसरपंच काटी 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. हा भाजप सरकारचा निर्णय निषेधार्य असून या निर्णयाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.
उपसरपंच जुबेर शेख
काटी ता. तुळजापूर

तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस सुशील चव्हाण यांच्या मार्फत शेतकऱ्यांनी शासनाला निर्णय मागे घेण्या संदर्भात निवेदन दिले.

या आंदोलनातवेळी सावरगावचे माजी सरपंच रामेश्वर तोडकरी, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, काटीचे माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, जिल्हा  परिषद सदस्य राजकुमार पाटील, अर्जुन सुरेश पाटील दहिवडीकर,शिवकुमार पाटील, प्रदीप  साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, वडगाव  काटीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे,अमोल  माने, ज्ञानेश्वर नांगरे, ॲड. अभिषेक थोरात, उपसरपंच जुबेर शेख, गजानन  देशमुख, माजी सरपंच शामराव आगलावे, संजय लिंगफोडे, वसंत हेडे, धनंजय  काशिद, धर्मराज शिंदे, प्रकाश गाटे, विश्वनाथ राऊत, पंढरी  डोके, रामहरी  लोंढे, मेघ मंडलिक (दहिवडी),चंद्रकांत माळी, मनोज  फंड, अक्षय फंड, मोहन माळी,  सुभाष शिंदे, अमोल काळदाते, धर्मराज  नकाते, सचिन नकाते, मोहन शिंदे, आदीसह तामलवाडी, सावरगाव, काटी, केमवाडी, दहिवडी आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
पत्रकार तथा संपादक Only न्युज तुळजापूर (वेब पोर्टल) उमाजी गायकवाड 
संपर्क:- 9923005236

Post a Comment

0 Comments