Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कांदा निर्यात बंदीविरोधात तामलवाडी , सावरगाव, काटी, वडगाव (काटी), केमवाडी परिसरातील शेतकरी आक्रमक; उद्या रविवारी तामलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

काटी| उमाजी गायकवाड 
केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यात बंदी जाहीर केली असून या निर्णयाविरोधात तामलवाडीसह परिसरातील काटी , सावरगाव, वडगाव (काटी), केमवाडी, खुंटेवाडी आदी गावातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून रविवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता तामलवाडी येथील  सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याजवळ शेतकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने कांद्यावर अचानकपणे शुक्रवार दि. 8 डिसेंबर रोजी निर्यात बंदी लादल्याने कांद्याचे भाव पडले आहे. आधीच अवकाळी व गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे, त्यातच शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक राहिल्याने त्या कांद्यास थोडाफार भाव मिळत असल्याने केंद्र सरकारने शहरी लोकांचा विचार करत तातडीने निर्यात बंदी लादली असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. जुलै - ऑगस्ट मध्ये पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट झाल्याने त्यामध्ये शेतकऱ्यांचा पेरणी खर्चही निघाला नाही.  25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून
कांदा निर्यात बंदीमुळे चार हजार रुपये विकणारा कांदा अचानक 2000 पेक्षाही खाली विकायला सुरुवात झाली आहे .त्यात कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आता लिलाव बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप झाल्याचे पहायला मिळत आहे. 

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात काटी,सावरगाव, तामलवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता  रोको आंदोलना संदर्भात तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक  पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण  यांना रितसर निवेदन देण्यात आले असून परिसरातील शेतकऱ्यांनी बहुसंख्येने या रास्ता रोको आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कांदा  उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी सावरगावचे माजी सरपंच रामेश्वर तोडकरी, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, काटीचे माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच जुबेर शेख, संजय लिंगफोडे,धर्मराज शिंदे,विश्वनाथ राऊत, पंढरी  डोके,चंद्रकांत माळी, मोहन माळी, सुभाष शिंदे, अमोल काळदाते आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
पत्रकार उमाजी गायकवाड
संपादक Only न्युज तुळजापूर
संपर्क:- 9923005236

Post a Comment

0 Comments