Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर तालुका खाजगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतपुरवठा संस्थेची निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध; काक्रंब्यातील संजीवनी विद्यालयाचे सहशिक्षक भोसलेंच्या निवडीबद्दल सत्कार

तुळजापूर|उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुका खाजगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतपुरवठा संस्था मर्यादित तुळजापूरची पंचवार्षिक निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध करण्यात आली. 

या संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संस्थेचे सभासद सहशिक्षक  विजय मोरे, चंद्रकांत साळुंखे, हरी जाधव, रामपुरे आर. के. शिंदे एस एस,शेख जब्बार,तम्मा सोलापुरे, फाटे भागवत, बसवराज मडोळे, मोहन माने,सूळ, श्रीमती बिराजदार एल. के., पाटील(मोरे)आर.बी., सूर्यवंशी के.एस.,गहिनीनाथ काळे,जाधव संजय, खान जी.जे., भाऊसाहेब पांढरे, आनंद कांबळे, नितीन पाटील, दंतकाळे, श्रीमती दत्तू मॅडम आदींनी पुढाकार घेतला होता. त्याबद्दल संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांनी सर्वांचे आभार मानले.

काक्रंब्यातील भोसले यांच्या निवडीबद्दल सत्कार 
तुळजापूर तालुका खाजगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या 
बिनविरोध झालेल्या निवडणुकीत  तुळजापूर तालुक्यातील संजीवनी माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक राम व्यंकट भोसले यांची वर्णी लागल्याबद्दल संजीवनी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक देवगुंडे  यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार व फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments