Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव येथे जिल्हास्तरीय शालेय तायक्वाँदो स्पर्धेचे उद्घाटन; १०५ खेळाडूंचा सहभाग

धाराशिव: जिल्हास्तरीय शालेय तायक्वाँदो स्पर्धेचे धाराशिव येथील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावर गुरूवारी (दि.७) उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ८ तालुक्यातून १०५ खेळाडू सहभागी झाले आहेत.

जिल्हास्तरीय शालेय तायक्वाँदो स्पर्धा धाराशिव येथील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावर घेण्यात येत आहेत. जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते स्पर्धेचे लढत लावून उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, पत्रकार तथा साहित्यीक रविंद्र केसकर, जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनचे सचिव तथा प्रशिक्षक राजेश महाजन, राष्ट्रीय पंच राम दराडे, माधव महाजन, चेतन तेरकर, शरीफ शेख, वैष्णवी भानवस्ते, क्रीडा शिक्षक विक्रम सांडसे आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, कळंब, उमरगा, लोहारा, भूम, परंडा व वाशी या ८ तालुक्यातून १०५ खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष श्री रणदिवे, क्रीडा अधिकारी श्री नाईकवाडी व पत्रकार श्री केसकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक सचिव श्री महाजन यांनी केले.

Post a Comment

0 Comments