मुरूम, ता. उमरगा, ता. ५ (प्रतिनिधी) : धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रेरणेने (ता. २ ते ४ जानेवारी) दरम्यान मुरुम येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेमध्ये आयोजित करणाऱ्या आलेल्या बीट स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कंटेकूरच्या खेळाडूंनी विविध मैदानी प्रकारात मारली बाजी. सांघिक खो-खो मध्ये मुली (प्रथम), वैयक्तीक मैदानी खेळामध्ये १०० मीटर धावणे नागिनी मंडले (प्रथम), ४०० मीटर धावणे उषा शिंदे (प्रथम), ८०० मीटर धावणे सुभद्रा दासे (प्रथम), ४ बाय १०० रिले नागिनी मंडले, उषा शिंदे, सुभद्रा दासे, साक्षी (प्रथम), लांब उडी नागीणी मंडले (प्रथम), उंच उडी उषा शिंदे (प्रथम), अमोल मंडले (प्रथम), गोळा फेक अमोल मंडले (प्रथम), योगासने आरती सातलगे (प्रथम) या सर्व खेळाडूंची (ता. ८ ते ११ जानेवारी) दरम्यान होणाऱ्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना शिक्षक गोविंद जाधव, विठ्ठल कुलकर्णी, लक्ष्मण येवते, शिवकुमार स्वामी, लतिफ लदाफ, लक्ष्मीकांत पटणे, चित्ररेखा दंडे, तनुजा गाढवे आदींनी त्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्ल सरपंच विजया जमादार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जागृत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी जमादार, शिक्षणविस्तार अधिकारी जिवराज पडवळ, मुख्याध्यापक कमलाकर मोटे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
मुरूम, ता. उमरगा येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत खेळाडूंचे अभिनंदन करताना सर्व मान्यवर व खेळाडू.
0 Comments