Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिक्षक समितीचे राज्य नेते बशीरभाई तांबोळी यांच्यासह जिल्हा नेते बाळासाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकाऱ्यांचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात राज्यउपाध्यक्ष लालासाहेब मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश; सापत्न व दुय्यम वागणूकीमुळे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश-बशीरभाई तांबोळी

तुळजापूर/उमाजी गायकवाड 
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नेते राज्यउपाध्यक्ष लालासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखालील अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात  जिल्हा अल्पसंख्याक पतसंस्थेचे चेअरमन बशीरजी तांबोळी, व्हा. चेअरमन तथा उस्मानाबाद तालुका सरचिटणीस मालोजी वाघमारे,सचिव बिलाल सौदागर यांच्यासह सर्व संचालक मंडळ,  शाहू पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा नेते बाळासाहेब वाघमारे,परंडा तालूका प्रमुख अरुण पाटील व महेंद्र रणदिवे यांनी  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात संघटनेचे राज्यउपाध्यक्ष लालासाहेब मगर यांच्या  प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशासोबतच छत्रपती शाहू महाराज जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुरेश भालेराव, व्हा. चेअरमन लहू जगताप, सचिव संतोष डोळे यांच्यासह पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ,जोशाबा शिक्षक पतसंस्था कळंबचे विद्यमान चेअरमन सचिन ताकपिरे,व्हा. चेअरमन शांतीलाल चौहान, सचिव संजय पवार यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ,आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, जिल्हा शिक्षक कॉंग्रेसचे राजेंद्र नारायणकर,डिसीपीएस विभाग शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष सचिन भांडे, समितीच्या मराठवाडा विभागीय महिला नेत्या श्रीमती सविता पांढरे,महिला शिक्षक समितीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता कराड, तुळजापूर समिती महिला आघाडी प्रमुख श्रीमती अनिषा कदम, भूमचे जिल्हा माजी सरचिटणीस बब्रुवान भोसले, तुळजापूर शिक्षक समितीचे नेते मोहन भोसले, लोहारा शिक्षक पतसंस्थेचे संचालक शिवाजी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव चव्हाण,शिक्षक समितीचे तालुका नेते चांगदेव थोरात, सुनील हिंगे,परांडा शिक्षक समितीचे नेते राजेंद्र रावसाहेब पाटील, छ. शाहू पतसंस्थेचे संचालक प्रफुल्ल झाडबुके, अल्पसंख्याक जि. शिक्षक पतसंस्थेचे संचालक जगदीश जाकते, राजाभाऊ गिरी,लक्ष्मण घोडके, प्रदीप तांबे,संजय गाडेकर, बाळासाहेब कांबळे,सुधीर गायकवाड, प्रवीण गाडे,दयानंद शिंदे, श्रीहरी बिडवे,मिलिंद जानराव, श्रीमती पार्वती नाईक, श्रीमती प्रियंका धनवे, खिजर मोरवे, रहीम तांबोळी,मुबारक पठाण, इलाही बागवान, मुमताज शेख, शहेनाज औसेकर, तब्बसुम बागवान, अनिषा कदम, एस ए.श्री. मारुती काळे, जोशाबा शिक्षक पतसंस्था कळंब चे संचालक महेंद्र रणदिवे, सचिन भांडे, गणपत गोरे, विशाल वाघमारे,अर्जून जाधव, श्रीमती बालिका वाघमारे,सुरेश ओहाळ, संजय भालेराव,विकास घोडके तसेच पवन क्षीरसागर (धाराशिव), बाळकृष्ण पाटील (धाराशिव), मिलिंद धावारे (धाराशिव), पेठे सर(धाराशिव), बोडके सर (तुळजापूर),उबाळे सर(कळंब),ओहाळ सर, पांडूरंग सोनवणे,आदी जिल्हा शिक्षक समितीच्या प्रमुख पदाधिकारी व प्रमुख संघटना नेते यांनी  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला.
यावेळी राज्यउपाध्यक्ष लालासाहेब मगर यांनी प्रवेश केलेल्या सर्व शिक्षक बांधवांचे स्वागत केले.

यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नेते राजाभाऊ आकोसकर, अविनाशजी मोकाशे, तालुकाध्यक्ष मुडबे सर, धाराशिवचे बसवलिंग चिवटे, राजकुमार म्हेत्रे,मोहन लष्करे, तानाजी शेळके,आदटराव साहेब दयानंद जेटीथोर, युवराज जाधव मगतराव सर, अतुल पोतदार, अमिन शेख, दुरुगकर सर, केवटे सर, मारुती घंदूरे, शेखू जेटीथोर, विठ्ठल जेटीथोर, सतीश ढोणे, गुरुलिंग कुताडे, दीपक ठोंबरे, नितीन हिरके,वानोळे सर यांच्यासह संघटनेतील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सापत्न व दुय्यम स्थानाच्या वागणूकीमुळे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश
--शिक्षक नेते बशीरभाई  तांबोळी

यावेळी आपण समितीतून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेशाचे कारण व भूमिका विशद करताना 
राज्य नेते बशीरभाई तांबोळी यांना गहिवरून आले होते .ज्या नितीमूल्यांसाठी हि संघटना मी अहोरात्र कष्ट करुन स्थापन केली त्याच संघटनेत माझ्यासारख्या संस्थापक सदस्याला सापत्न व दुय्यम स्थानाची वागणूक स्वतःच्या  आर्थिक स्वार्थासाठी काही लोक देत असतील  तर माझ्यासारख्या स्वाभिमानी माणसाची तिथे घुसमट होते. म्हणून मी ती संघटना अतिशय जड अंतःकरणाने सोडून या अखिल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला असल्याचे सांगितले.

शिक्षक बांधवांच्या हितासाठी निर्णय
संघटनेचे नेते बाळासाहेब वाघमारे व अरुण पाटील यांनीही या संघटनेतील कार्यपद्धतीवर विशेषत:शिक्षकांची कामे करत असताना होत असलेली घुसमट, संघटनेतील काही पदाधिकारी करत असलेल्या आर्थिक शोषणावर जोरदार ताशेरे ओढून लालासाहेब मगर यांच्या कणखर व शिक्षक बांधवांच्या हितासाठी वाहून घेतलेल्या लालासाहेब मगर यांच्या स्वाभिमानी नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

संघटना मजबूत करण्यासाठी अहोरात्र झटणार; शिक्षकांच्या कामासाठी होणारी दलाली थांबवण्यासाठी प्रयत्नशील
-राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर
संघटनेत प्रवेश करतेवेळी आपले मनोगत व्यक्त करताना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर यांनी  प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन करुन म्हणाले की, आज झालेला प्रवेश हा फक्त प्रमुख लोकांचा प्रवेश असल्याचे सांगून येत्या काही दिवसांत हि संघटना मजबूत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना ही देशव्यापी असून या जिल्ह्य़ात शिक्षकांची कामे करताना होणारी दलाली थांबवून ती मोफत झाली पाहिजेत यासाठी आता आमचे सर्वांचे प्रयत्न असतील असे सांगितले. लवकरच जिल्हा मेळावा राज्याच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत घेवून कार्यकारिणी निवडण्यात येईल असेही  आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच यावेळी बशीरजी तांबोळी व लालासाहेब मगर यांनी जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब वाघमारे व जिल्हा सरचिटणीस पदी अविनाशजी मोकाशे यांची निवड जाहीर केली. या  कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सहशिक्षक शिवाजी साखरे यांनी केले.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments